मराठी दिन २७ फेब्रुवारी माहिती, निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

मराठी दिन २७ फेब्रुवारी माहिती, निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

मराठी माणूस आता जगाच्या काणा कोपऱ्यात पोहचला आहे; कोणी शिक्षणासाठी, व्यवसायासाठी तर कोणी नोकरी साठी. आपली मुले हिंदी, इंग्रजी आणि दुसऱ्या भाषेमधील चित्रपट, कार्यक्रम, वेबिसोडस पाहतात. दुसऱ्या भाषेची पुस्तके, मॅगझीन वाचतात, या सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. इंग्रजी ला भारतात खूप प्राधान्य दिले जाते, ते काही तसे चुकीचेही नाही, इंग्रजी आता शिक्षणात, व्यवसायात, संसदेमध्ये सुद्धा वापरली जाते. विविध भाषांतून विविध गोष्टी, संस्कृती, प्रथा, साहित्य, इतिहास शिकता येतो. याला विना कारण विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.

पण, या सर्वात, जागतीकरानाच्या स्पर्धेत आपण आपली मातृभाषा, मराठी विसरता कामा नये. मराठी भाषा हि खूप श्रीमंत भाषा आहे, तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे. संतांच्या कीर्तने, भजन, भारुडानी ती सजवली आहे. छत्रपती महाराजांनी आपल्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले.

आपल्या शिक्षित शहरी पिढीला मराठी भाषेची लाज वाटते, ते हिंदी किंवा इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात. त्यांना आपली मराठी भाषेची सुंदरता आणि संपत्ती समजावून द्यावी लागेल. काही राजकीय गट याचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात, ते ही चुकीचे आहे. आपली मराठी भाषा इतकी सामर्थवान आणि प्रेमळ आहे कि ती कोणावर जबरदस्ती थोपण्याची गरज नाही. आपल्याला आपल्या नवीन पिढी मराठी भाषेची सुंदरता दाखवून देण्याची गरज आहे फक्त.

मराठी भाषा दिनाचे महत्व

या जागरूकतेचे काम करते वार्षिक “मराठी भाषा दिन’. जगभरातील मराठी माणसे दर वर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस साजरा करतात. महान मराठी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचं जन्मदिसावाच्या निमित्ताने हा दिवस “मराठी भाषा दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी जागतिक मराठी अकादमीने याचा पुढाकार घेतला. या दिवसाला विविध प्रकारे संबोधले जाते, जसे “मायबोली मराठी भाषा दिन”, “मराठी भाषा गौरव दिन”, “जागतिक मराठी राजभाषा दिन ” इत्यादी.

READ  Essay on Shivaji Maharaj in Marathi

२७ फेब्रुवारी च्या दिवशी महाराष्टात आणि देशभरात व जगभरात जिथे जिथे मराठी माणसे आहेत हा दिवस साजरा केला जातो. विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, कार्यक्रम आयोजित केले जातात.

कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यामधले योगदान

विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ ला पुणे इथे झाला त्यांना त्यांच्या टोपण नावाने जास्त ओळखले जाते. कुसुमाग्रजांनी कवितांसोबत कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमय ही लिहले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होणाऱ्या पाच दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी १६ खंडांची कविता, तीन कादंबरी, लघुकथेचे आठ खंड, निबंधांचे सात खंड, १८ नाटकं आणि सहा एकांकिका लिहिल्या. १९४२ च्या “विशाखा” ग्रंथांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुण पिढीला प्रेरित केले आणि आजही भारतीय साहित्याचे उत्कृष्ट काम म्हणून या ग्रंथाला ओळखले जाते. नाट्यसम्राट हे नाटक त्यांनीच लिहले आहे, यावर आधारित नाना पाटेकरांच्या सिनेमा खूप प्रशंसा मिळवून गेला. ते राज्य आणि राष्ट्र सरकारच्या खूप साऱ्या पुरस्कारांचे मानकरी ठरले. १९७४ मध्ये मराठी नाटक नटसम्राट साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९८७ मध्ये ज्ञानपीठपुरस्कार आणि १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.

%d bloggers like this: