Sant Sakhubai

सखुबाई Sant Sakhubai

 

sant_sakhubai

sant_sakhubai

Sant Sakhubai “ज्यांनी आपले सर्वस्व परमात्माच्या चरणी अर्पण केले. त्यांची महिमा खूप अपार आहे. अश्या प्रकारच्या भक्तांसाठीच देवाला विविध लीला ह्या कराव्या लागतात. ते आपल्या भक्तांसाठी लहान असलेले कार्य सुद्धा करण्यास तयार राहतात.
महाराष्ट्राच्या कृष्ण नदीच्या किनाऱ्यालगत कऱ्हाड नावाचे ठिकाण आहे, तेथे एक ब्रह्मन् राहत होता त्याच्या घरी चार जण राहत होते.
तो ब्राह्मण,त्यांची पत्नी ,पुत्र, आणि त्याची पुत्री,त्यांच्या मुलीचे नाव सखुबाई होते.
सखुबाई जेवढी आज्ञाकारी, सुशील, नम्र आणि साध्या स्वभावाची होती तेवढीच दुष्ठ ,अभिमानी, कुटील,आणि कठोर हृदयाची तिची सासू होती.
पती व पुत्र देखील तिच्याच स्वभावाचे अनुकरण करत होते.
सखुबाई प्रातःकाळ पासून ते रात्र होईपर्यंत न थकता घरचे सर्व काम करत असत.शरीर पेक्षा अधिक काम करत असल्याकारणाने ती अस्वस्थ राहायची तरी सुद्धा ती त्या अळसपणाकडे दुर्लक्ष करून हे आपले कर्तव्यच आहे असे ती समाजात होती.
संत सखू बाई हि मनातल्या मनात आपल्या देवाचे अखंड ध्यान आणि केशव विठ्ठल आणि कृष्ण गोविंदाचे नामस्मरण करत असायची.
दिवस भर काम करूनसुद्धा ती आपल्या सासूचे बोलणे आणि सासूचे मारहाण सहन करून घ्यायची. आपल्या पती समोर दोन अश्रू काढून मन शांत करणे हे सुद्धा तिच्या नशिबात नव्हते. कधी कधी काही चूक नसताना देखील तिची सासू तिला छळायची आणि मारहाण सुद्धा करायची.परंतु तिच्या शांत स्वभावामुळे ती ह्या सर्व गोष्टी आणि त्रास लगेच विसरून जायची. एवढ सगळं घडून देखील ती हा देवाचाच आशीर्वाद आहे असे समजून प्रसन्न राहायची आणि सदा देवाचे आभार मानायची कि हे देवा तुमची कृपादृष्टी आहे जेणे करून मला तुम्ही एवढा चांगला परिवार दिला नाहीतर मी ह्या मोहमायेत फसले असते.
एका दिवशी एका शेजाऱ्याने तिच्या ह्या अवस्थेकडे पाहून म्हटले कि , बाई तुझे हालहवाल विचारणारे कोणी नाही का? तुला कोणी नातलग नाहीत का?
तेव्हा ती म्हणाली ,”माझा नातलग मायबाप फक्त पांडुरंग आहे आणि पंढरपूर हेच माझे महेर आहे, एक दिवस ते मला बोलावून माझे सुख दुःख दूर करतील ”
सखुबाई आपले घरचे काम आटोपून कृष्ण नदीवर पाणी आणण्यास गेली तेव्हा तिने पहिले कि भक्तांचे झुंड विठ्ठल नामस्मरण करत पंढरपूरला जात आहेत. एकादशी दिवशी तेथे फार मोठी जत्रा भरत असे. तिची सुद्धा पंढरपूरला जाण्याची इच्छा होत होती परंतु घरच्यांकडून आज्ञा मिळणे मुश्किल होते म्हणून ती त्या संत मंडळी बरोबर निघाली.
हि बातमी तिच्या एका शेजाऱ्याने तिच्या सासूला कळवली. आणि नंतर आईच्या सांगण्यावरून तिचा पती(सखूबाईचा) तिला ओढत फरफट तिला घरी घेऊन आला आणि तिला दोरीने बांधले. परंतु सखूबाईच मन तर प्रभू दर्शनाशिवाय राहत नव्हतं.
ती देवा कडे रडत रडत विनंती करू लागली कि “माझे नेत्र हे आपल्या दर्शनाविनाच राहतील का? कृपा कर देवा ..
मला मरणाची भीती नाही परंतु फक्त एकवेळ तुमचे दर्शन द्या देवा”
माझे आई वडील भाऊ आणि मित्र सुद्धा तुम्हीच आहेत, मी जशी पण असें तुमचीच आहे .
भक्ताची मनापासून पुकार देवाला अवश्य पोहचते. त्याचप्रमाणे संत सखुबाई ची पुकार एकूण देव एका स्त्री रूपात आले आणि तिला म्हणाले मी तुझ्या जागी बांधून राहील आणि तू चिंता करू नकोस असे म्हणून देवांनी तिचे बंधन मुक्त केले आणि तिला पंढरपूरला पोहचवले.
आणि इकडे तिची सासू रोज तिच्या जवळ येऊन आपली खरी खोटी ऐकवत असे आणि ती सगळी सहन केली जात.
ज्यांच्या फक्त नामस्मरणाने मोह माया आदींचे बंधन तुटून जातात ते आपल्या भक्तांसाठी सर्व प्रकारचे बंधन स्वीकार करतात.
आज सखू बनलेल्या देवाला देवाला बांधून दोन आठवडे झाले. आणि तिची अशी दशा पाहून तिच्या पतीला वर वाईट वाटले, त्याने सखूची क्षमा मागितली आणि स्नान करून जेवण करण्यास सांगितले.

READ  संत गोरोबाकाका कुंभार (Sant Goroba Kumbhar Maharaj)

 

Sant Sakhubai

आज देवाच्या हातचे जेवण करून सर्वांचे पाप निघून गेले..
तिकडे सखू हे विसरली कि तिच्या जागी कोणी दुसरीच स्त्री बांधली आहे.
तिचे पंढरपूर मध्ये एवढे मन रमले कि तिने प्रतिज्ञा केली कि जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी पंढरपुरातच राहीन.
प्रभूच्या नामस्मरणात तिची समाधी लागली आणि शरीर अचेत होईन जमिनीवर पडले. गावातील लोकांनी ती मृत आहे असे समजून तिचे अंतिम संस्कार केले
इकडे माता रुक्मिणीस चिंता होऊ लागली कि माझे स्वामी हे सखुबाई च्या जागेवर बांधलेले आहेत.
माता रुक्मिणी स्मशानात गेली आणि तिथून सखू बाईच्या अस्थी एकत्र करून पुनर्जीवित केले आणि सर्व प्रकार तिला आठवण करून दिला आणि तिला कऱ्हाड जाण्यास सांगितले.
कऱ्हाड पोहचल्यावर जेव्हा तिने त्या स्त्री बनलेल्या देवाला भेटली तेव्हा तिने क्षमा मागितली आणि तिच्या घरच्या सासू सासऱ्यांच्या स्वभावातील बदल पाहून आश्चर्यचकित झाली.
दुसऱ्या दिवशी एक ब्राह्मण सखू च्या अंतरधाम पावल्याची बातमी घेऊन कऱ्हाड ला आला आणि सखूला काम करताना पाहून आश्चर्यचकित झाला
तो सखूबाईच्या सासऱ्यास म्हणाला कि , “तुमची सखू तर पांढर पुरामध्ये यानंतर धाम पावली होती “.
पती म्हणाला – “सखू बाई तर पंढरपूरला गेलीच न्हवती ” तुमचा कदाचित गैरसमज झाला असावा..
जेव्हा हि घटना सखूला विचारली तेव्हा ती घडलेली सर्व घटना सांगू लागली.
सर्वाना आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झाला.
आणि सर्वजण म्हणू लागले कि निश्चितच ते परमात्मा पांडुरंग विठ्ठल होते.

 

%d bloggers like this: