लोणावळा,खंडाळा

LONAVALA-KHANDALA HILL STATION MAHARASHTRA INDIA

लोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

पावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळयात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.

लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.

इतिहास

लोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ते ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.[३] १८७१ मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गवर्नर लॉर्ड एलीफिन्स्तन ने लोणावळा आणि खंडाळा शोधले.

लोकसंख्याशास्त्र

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळाची लोकसंख्या ५७,६९८ होती. ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९.३३% आहे. लोणावळ्याची १०.३७% लोकसंख्या हि ६ वर्षाखालील मुले आहेत.

READ  कोल्हापूर अंबाबाईचे मंदिर

लोणावळा आणि खंडाळाच्या आसपासची पर्यटनस्थळे

राजमाची पॉईंट

राजमाची पॉईंट लोणावळा पासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते

टायगर पॉईंट

टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मी. ची खोल दरी आहे.

कार्ला लेणी

कार्ला लेण्यांचे निर्माण बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केले. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे

लोहगड किल्ला

मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमीच्या चढाईनंतर तुम्ही ह्या एकेकाळी शिवाजी महाराज्यांचा लष्करी तळ असलेल्या लोह किल्ल्याला पोहोचू शकता.

भुशी धरण

लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील धबधबा प्रसिद्ध आहे.

वाहतूक

लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी एक्झिट आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लोणावळ्यातूनच जातो. लोणावळा रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील महत्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.

 

%d bloggers like this: