JAWHAR PARYATAN MAHARASHTRA HILL STATION 

JAWHAR PARYATAN MAHARASHTRA HILL STATION

  जव्हार

—  तालुका  —

गुणक: 19°56′39″N 73°13′43″E
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
• उंची
• ४४७ मी
जवळचे शहर बोईसर
जिल्हा पालघर
लोकसंख्या ११,२९६ (२००१)
भाषा मराठी
तहसील जव्हार
नगरपालिका जव्हार
कोड
• पिन कोड
• दूरध्वनी
• आरटीओ कोड
• ४०१६०३
• +०२५२०
• एमएच ०४
संकेतस्थळजव्हारदर्शन.कॉम www.jawhardarshan.com जव्हारदर्शन.कॉम

 

काळमांडवी धबधबा.

जय विलास पॅलेस, जव्हार

हनुमान पॉइंटपासून दिसणारा जय विलास पॅलेस

जव्हार हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे शहर वसले आहे.

जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिलस्टेशन आहे. हे नाशिकपासून १६० कि.मी.वर आणि मुंबईपासून ८० कि.मी.वर जव्हार हे एक सुंदर व समुद्र सपाटी पासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे.जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे.जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण आहे खास करून पर्यटनासाठी आपण सर्वांनी एकदा तरी या शहराला भेट द्यावी मुख्य: मुंबई ठाणे यासारख्या शहरातील प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांनी या ठिकाणी जरूर यावे. जव्हार मध्ये काळमांडवी धबधबा, दाभोसा धबधबा खूप सुंदर आहे.जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाँईँट,हनुमान पाँईँट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.

पर्यटन

  • शिरपामाळ
  • हनुमान पॉईंट
  • सनसेट पॉईंट
  • जय विलास पॅलेस
  • दाभोसा धबधबा
  • काळ मांडवी धबधबे
  • भोपतगड

हनुमान पॉइंट,सनसेट पॉइंट, शिरपामाळ, जय विलास पॅलेस(राजवाडा),भोपतगड, दाभोसा धबधबा, काळमांडवी धबधबा,हिरडपाडा धबधबा इ.ठिकाणे पर्यटनासाठी व सहलीसाठी प्रसिद्ध आहेत.

मे महिन्याच्या सुट्टीत पर्यटक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी पिकनिकसाठी जातात. असेच एक ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. ठाण्याचे ’महाबळेश्वर’ समजले जाणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे जव्हार. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

त्यापूर्वी १ सप्टेंबर १९१८ला राजे मार्तण्ड यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषद स्थापन केली, अशी माहिती जव्हार संस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आजघडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत पहावयाला मिळतो. राजवाड्याची इमारत दुमजली. जुन्या राजवाड्याच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावे, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.

  • हनुमान पॉइंट-

शहरापासून सुमारे १ ते २ कि.मी. अंतरावर शहराच्या पूर्व बाजूला एक ५०० फूट खोल व्हॅली आहे. त्या व्हॅलीत एक मंदिर आहे. त्या मंदिराला कट्टा मारुती मंदिर म्हणून सुद्या ओळखले जाते , निवडुंगांच्या गडद वनाने वेढलेले असे ते जुने मंदिर आहे. मंदिराचे नूतनीकरण झाले आहे आणि आता तो हनुमान पॉइंट म्हणून ओळखला जातो. रात्रीच्या वेळी या पॉइंटपासून कसारा घाटातून जाणाऱ्या गाड्यांचे दिवे दिसतात. धुके नसेल तर, दिवसा शहापूरचा ऐतिहासिक किल्ला दिसू शकतो.

सिल्व्हासा रोडवरील दाभोसा धबधबा जव्हारपासून १८ कि.मी.वर आहे. हा धबधबा लेँडी नदीवर आहे आणि सारसून येथे नदीच्या दुसऱ्या बाजूला दादरकोपरा धबधबा आहे.

भोपतगड भोपतगड हा जव्हार तालुक्यातील झाप या गावाजवळ असणारा एक किल्ला आहे सुंदर अशी तटबंदी या किल्ल्यात आहे तसेच तेथे गरम पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत. सुंदर असे ऐतिहासिक ठिकाण आहे.

  • जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीतदिनांक १३ नोव्हेंबर १९४४साली राजमान्यता मिळाले जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत,बडोद्याचे राजकवी ज्ञानरत्न यशवंत दिनकर पेंढारकर यांनीजव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धवरून परत आल्यानंतरत्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त जव्हार संस्थानचे स्वतंत्र राष्ट्रगीत म्हणून रचले.जव्हार संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद,राजांची शौर्य गाथा,मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीनेजव्हार संथांचा गौरव करणारेहे राष्ट्रगीत आजपासून ६४ वर्षापूर्वी अर्थात दि.१३ नोव्हेंबर १९४४ सालीराजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थान विलीनीकरणापर्यंतप्रत्येक समारंभात गायले जात असे.जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत

जय मल्हार ! जय मल्हार !
गर्जु या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II

येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचे हि वर II२II

साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहारII३II

सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सुर्यांकित I
दावी राज्य हे जव्हारII ४ II

प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होवू जीवावर उदार II ५ II

जय वंशी क्षेम असो I
राजा विर्यो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ II

READ  Shirdi,temple of Sai Baba (शिर्डी साई बाबा मंदिर)
%d bloggers like this: