KARJAT HILL STATION MAHARASHTRA PARYATAN

KARJAT HILL STATION MAHARASHTRA PARYATAN

थंडा कूल…कर्जत

karjat

संतोष दळवी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधली लोकेशन्स बाराही महिने पर्यटकांना साद घालत असतात. पावसाळ्यात विलोभनीय धबधबे शिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहणारं पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतं. भिवपुरी पॉवर हाऊसमधून वीजनिर्मिती करून जे पाणी बाहेर पडते ते आधी पेज नदीला आणि नंतर उल्हास नदीला मिळतं. त्यामुळे कर्जत तालुक्यातल्या या नदी पात्रातील सखल ठिकाणं सध्या पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत. इथलं पर्यटन बाराही महिने मुंबई-पुणेकरांना साद घालत असतं. याच परिसरातल्या अनेक ठिकाणी शेतीलाही पाणी जात असल्याने हिरवाई बहरलेली दिसते. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही इथे फिरायला मजा येते. कर्जत तालुक्यातल्या राजनाला परिसरात बाराही महिने पाणी असतं. राजनाला, पेज नदी आणि उल्हास नदी याठिकाणी बाराही महिने पाणी असल्याने ते स्विमिंग स्पॉट बनलेत. त्यामुळे इथे मनसोक्त पोहोण्याचा आनंद लुटता येतो. उन्हाची वाढती काहिली लक्षात घेता या नदी-नाल्यावर पोहण्यासारखा आनंद नाही. अर्थात पोहताना काळजी घेणं आणि आजुबाजूच्या परिसरात वावरताना तिथे अस्वच्छता होणार नाही ते पर्यटकांनी पाहिलं पाहिजे हे ओघानं आलंच. कर्जत तालुक्यातल्या वैजनाथ, गणेगाव- चिंचवली- कळंबोली, कराळेवाडी, वंजारवाडी, नेरळ या भागात नदीवर पोहोण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने हे स्पॉट पर्यटकांनी ओसंडून वाहत असतानाच इथल्या स्थानिकांना रोजगाराची संधीही देऊन जात आहे. स्वतःची गाडी असल्यास एक दिवसाचा प्लॅन करता येऊ शकतो. तसंच ट्रेननं आल्यास कर्जत रेल्वे स्टेशनहून या भागात येणाऱ्या अनेक गाड्या उपलब्ध आहेत. आजूबाजूला जेवण्यासाठी अनेक रिसॉर्ट आणि खानावळी आहेत. स्विमिंग स्पॉटवर जाताना जेवणाची हवी तशी ऑर्डर देऊन जावं लागतं. काही खानावळीवाले तर स्पॉटवर जेवण पोहोचवतात त्यामुळे वनभोजनाचा आनंदही लुटता येतो. ज्यांना राहायचं आहे त्यांच्यासाठी रिसॉर्टही आहेत.

कुठे आणि कसं?

l गणेगाव चिंचवली कळंबोली कर्जत स्टेशनवरून मिनीडोअर रिक्षानं किंवा शेअर रिक्षानं कडाव किंवा डायरेक्ट स्पॉटवर जाता येतं. मात्र स्पॉटवर यायच्या आधी कडावमध्ये गावडे किंवा शिवतेज खानावळीत ऑर्डर द्यावी लागते. किंवा याच परिसरात एक मोठं रिसॉर्ट आहे.

READ  Chattushringi Temple Pune Maharashtra Paryatan

l वैजनाथ कराळेवाडी वैजनाथ हे कर्जतपासून १७ किमीचं अंतर आहे. भिवपुरी पॉवर हाऊसमधून वीज निर्मिती होऊन निघणाऱ्या पाण्याचा उगम याच परिसरातून होतो. वैजनाथ येथे चक्रदेव किंवा गुरव यांच्याकडे जेवणाची ऑर्डर देऊ शकतो. इथेही डायरेक्ट मिनीडोअर रिक्षाने थेट पोहोचता येतं. शिवाय याच परिसरात काही रिसॉर्टही आहेत, ति‌थे राहू शकतो

l वंजारवाडी कडावपासून हे अंतर दीड किलोमीटरवर आहे कडावमधील खानावळीत जेवणाची ऑर्डर देऊ शकतो. शिवाय इथल्या रिसॉर्टसवर जेवणाच्या ऑर्डरसहित राहण्याची सोयही आहे. इथे रिक्षा किंवा कशेळेमार्गे जाणाऱ्या एसटी बसेसनी जाता येतं.

%d bloggers like this: