Mahabaleshwar Hill Station Maharashtra

Mahabaleshwar Hill Station Maharashtraमहाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे एक नगरपालिका असणारे तालुक्याचे शहर आहे. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम घाटातील उंच डोंगरावर हे वसलेले शहर आहे. भारतातील जी हिरवळीने सजलेली कांही मोजकीच ठिकाणे आहेत त्यातीलच हे एक ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती. याचे क्षेत्रफळ १३७.५१ किमी.(५२.९५ स्क्वे.मीटर) आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची १३५३ मीटर(४४३९ फुट) आहे. सन २०११ चे शिरगणतीनुसार याची लोकसंख्या १२७३७ आहे. येथे मराठी, हिन्दी या भाषा बोलल्या जातात. पुरुष / स्त्री प्रमाण १०/९ असे आहे. येथील साक्षरता प्रमाण ७८% आहे. ६ वर्षाखालील मुलाची ११% लोकसंख्या आहे.

भौगोलिक परीस्थिती आणि हवामान

महाबळेश्वर शहर १७.९२३७ उत्तर अक्षांश आणि ७३.६५८६ पूर्व रेखांश वर वसलेले आहे. याची सरासरी उंची १३५३ मीटर(४४३९फुट) आहे. हे पुणे शहराच्या पश्चिम दक्षिण बाजूस १२० किमी.आणि मुंबई पासून २८५ किमी अंतरावर आहे. हे १५० वर्ग किमी क्षेत्रफळ असणारे विशाल असे पठार आहे आणि त्याच्या सर्व बाजूंनी खोल दर्‍या आहेत. याचे समुद्रसपाटीपासून सर्वात उंच ठिकाण १४३९मी.आहे जे विल्सन / सनराईज पॉइंट म्हणून ओळखले जाते.मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग, अशा तीन खेडेगावांचे मिळून हे शहर निर्माण झालेले आहे.

कृष्णा नदीचा उगम येथे झालेला आहे की जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. जुन्या महाबळेश्वर मधील पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील गोमुखातून या नदीचा उगम झाला अशी दंतकथा आहे. याची अशीही दंतकथा आहे की सावित्रीने विष्णूला शाप दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. शिवाय हिच्या वेण्णा आणि कोयना या उपनद्या म्हणजे शिव आणि ब्रम्हा आहेत असे म्हटले जाते. आणखी एक मनोरंजक बाब म्हणजे या कृष्णा नदीशिवाय आणखी ४ नद्या त्याच गोमुखातून उगम पावलेल्या आहेत पण त्या कृष्णा नदीला मिळण्याअगोदर कांही अंतरावरून वाहातात. त्या म्हणजे कोयना, वेण्णा, (वेणी) सावित्री, आणि गायत्री या नद्या आहेत.

महाबळेश्वरचे हवामान स्ट्रॉबेरीसाठी योग्य आहे.त्यामुळे या भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. भारत देशाचे एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी ८५% स्ट्रॉबेरी उत्पादन येथे होते.

पर्यटन

हे एक थंड हवेचे ठिकाण आहे.येथील महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले. अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी महाराजांनी या महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.

READ  Haji Ali Dargah, Mumbai (हाजी अली दर्गाह,मुंबई)

महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो. येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे असून या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्रीगोवित्री या पाच नद्या उगम पावतात. येथे पंचगंगेचे देऊळ आहे.हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत. वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय. वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे, गाजरे प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.

पर्यटकासाठी येथे जुन्या महाबळेश्वर पासून ७ किमी अंतरावर खूप प्रेक्षणीय ठिकाणे आहेत शिवाय ५ मंदिरे आहेत की जी पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात. येथे नैसर्गिकरित्या तयार झालेली दर्शनीय ठिकाणे आहेत. ब्रिटिश राजवटीत कांही ब्रिटिश येथे विश्रांतीसाठी येत त्यावेळी त्यांनी कांही ठिकाणांना नावे दिलेली आहेत.पाच नदीचे उगम स्थान म्हणून ओळखले जाते.

महाबळेश्वर बाजारपेठ

महाबळेश्वर बाजारपेठ फार प्रसिद्ध आहे. येथे लोकरीचे कपडे,स्वेटर,चामड्याचे बेल्ट,पर्से इ. विविध प्रकारात् मिळतात.

mahableshwar hillsपंचगंगा मंदिर

कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा सरस्वती, आणि भागीरथी या ७ नद्यांचे उगमस्थान आहे की जे पाहिलेच पाहिजे. यापैकी पहिल्या पांच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक ६० वर्षानी दर्शन देतो. आता तो २०३४ साली दर्शन देईल. भागीरथीचा ओहोळ प्रत्येक १२ वर्षानी दर्शन देतो. हा आता सन २०१६ मध्ये मराठी श्रावण महिन्यात दर्शन देईल. हे मंदिर ४५०० वर्षापूर्वीचे आहे. येथून बाहेर पडल्यानंतर कृष्णा नदी स्वतंत्र वाहाते. येथे कृष्णाबाई हे स्वतंत्र मंदिर आहे.

कृष्णाबाई मंदिर

पंचगंगा मंदिराचे पाठीमागे अगदी जवळच कृष्णाबाई मंदिर आहे की जेथे कृष्णा नदीची पूजा केली जाते. हे सन १८८८ मध्ये कोकणचे राजे रत्नगिरीओण यांनी उंच टेकडीवर बांधले की जेथून पूर्ण कृष्णा दरी पाहता येते. या मंदिरात शिव लिंग आणि कृष्णाची मूर्ती आहे. लहानसा ओहोळ गोमुखातून वाहतो आणि तो पाण्याच्या कुंडात पडतो. पूर्ण मंदिराचे छतासह दगडी बांधकाम हे विशेष वैशिष्ट्य आहे. या मंदीराजवळ दलदल झालेली आहे आणि नाशवंत स्थितीत आहे. येथे पर्यटक फार कमी येतात त्याने ते एकटे पडलेले आहे. पण या ठिकाणाहून अतिशय सुंदर असा कृष्णा नदीचा देखावा पाहता येतो.

READ  Maharashtra Tourism Information In Marathi

मंकी पॉइंट

या ठिकाणाला हे नाव दिलेले आहे त्याला कारण असे की नैसर्गिक रित्या येथे तीन दगड आहेत ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहेत असे वाटते आणि गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात. तेथील खोल दरीत डोकावले की एका मोठ्या पाशानात ३ हुशार मंकी समोरासमोर बसलेले आहेत असे चित्र नजरेला दिसते. आर्थर सीट पॉइंटला जान्याच्या मार्गावर हा पॉइंट आहे.

आर्थर सीट पॉइंट

समुद्र सपाटीपासून १,३४० मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे.हे एक सुंदर ठिकाण आहे.खाली खूप खोल दरी आहे.

वेण्णा लेक (वेण्णा तलाव)

महाबळेश्वर हे विश्रांतीचे ठिकाण व सहलीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. वेन्ना लेक हे पर्यटकांसाठी महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षक ठिकाण आहे. हे लेक सर्व बाजूंनी हिरव्यागार झाडांनी वेढलेले आहे. महाबळेश्वर मध्ये सामान्य ते ३ स्टार हॉटेल्स कमी बजेट मध्ये उपलब्ध आहेत आणि तेथून तुम्ही लेकचा देखावा नजरेत सामाऊ शकता किंवा प्रसिद्ध बाजारपेठेत राहूनही आनंद घेऊ शकता.

केइंटटस् पॉ

महाबळेश्वरचे पूर्व बाजूस हा पॉइंट आहे. येथून तुम्ही बलकवडी आणि धोम धरणांचा देखावा पाहू शकता. या पॉइंटची ऊंची साधारण १२८० मीटर आहे.

नीडल होल पॉइंट / एलीफंट पॉइंट

काटे पॉइंट जवळच हा निडल पॉइंट आहे. नैसर्गिक रित्या खडकाला सुईसारखे भोक आहे ते सहजतेने दिसते म्हनून त्याला नीडल होल नाव दिलेले आहे. हा पॉइंट हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो म्हणून त्याची डेक्कन ट्रप म्हणून ही प्रसिद्धी आहे.

विल्सन पॉइंट

सर लेस्ली विल्सन हे सन १९२३ ते १९२६ मध्ये मुंबईचे राज्यपाल होते तेव्हा या पॉइंटला त्यांचे नाव दिले आहे. महाबळेश्वर मधील हा १४३९ मी.ऊंचीचा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉइंट आहे. महाबळेश्वर मधील हा एकच पॉइंट असा आहे की, येथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहू शकता. महाबळेश्वरचे सर्व दिस्यांची आकर्षकता तुम्ही येथून न्याहाळू शकता. महाबळेश्वर मेढा मार्गाच्या पाठीमागील बाजूस हा विल्सन पॉइंट महाबळेश्वर शहरापासून १.५ की.मी. अंतरावर आहे.

प्रतापगड

प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर जवळ आहे. हा शिवाजी राजानी बांधला आहे.शिवाजी राजांनी विजापूरचे सरदार अफझलखानला हरवले आणि ठार केले म्हणून हा प्रतापगड किल्ला भारताचे इतिहासात प्रसिद्ध आहे.

READ  शेगाव गजानन महाराज मंदिर

लिंगमाला धबधबा

महाबळेश्वर जवळ हा धबधबा आहे. साधारण पणे ६०० फुट उंचीवरून हे पाणी वेण्णा तलावात पडते. खडकाचे योजनापूर्वक विभाजन करून हा धबधबा बनविलेला आहे.

इतिहास

महाबळेश्वरचा पाठीमागील इतिहास पाहीला तर साधारण १२१५ मध्ये देवगिरीचे राजे सिंघण यांनी जुने महाबळेश्वरला भेट दिली तेव्हा त्यांनी कृष्णा नदीचे काठावर झर्‍याचे ठिकाणी एक लहानसे मंदिर आणि एक जलाशय बांधले. १६ व्या शतकात चंद्रराव मोरे या मराठी कुटुंबाने पूर्वीच्या राजकुळाचा पराभव केला आणि जावळी व महाबळेश्वरचे राजे झाले.त्या काळात या मंदिराची पुनर्बांधणी केली.

१७ व्या शतकात शिवाजी राजांनी जावळी व महाबळेश्वर ताब्यात घेतले आणि १६५६ मध्ये प्रतापगड किल्ला बांधला.

सन १८१९ मध्ये ब्रिटीशांनी सर्व डोंगरी भाग साताऱ्याच्या राज्यांच्या छत्राखाली आणला. कर्नल लॉडविक हे सातारचे स्थानिक अधिकारी होते त्यांनी एप्रिल १८२४ मध्ये विभागातील सर्व सैनिक आणि वाटाड्याना तसेच भारतीय मदतनीस घेऊन या पॉइंट पर्यन्त पोहचले तो आता लॉडविक पॉइंट म्हणून ओळखला जातो. सन १८२८ पासून सर जॉन मॅल्कॅम, सर माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन, आर्थर मॅलेट, करणक, फ्रेरे आणि कितीतरी येथे भेटी देणारे होते. महाबळेश्वरची ओळख १९२९-३० मध्ये झाली. त्यापूर्वी ते माल्कम पेठ या नावाने ओळखले जात होते. पण आता ते महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर येथे “राज भवन” हे उन्हाळ्यात महाराष्ट्राचे राज्यपालांचेसाठी निवासस्थान आहे ते दी. टेरेस नावाच्या जुन्या इमारतीत आहे तिची खरेदी १८८४ मध्ये केलेली आहे.

वाहतूक

बसमार्ग

सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्याच्या गावापासुन महाबळेश्वर ३२ की.मी. अंतरावर आहे. सातारा शहर ४५ की.मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्ग ४ ला जोडलेले आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर येथून महाबळेश्वरला येण्यासाठी MSRTC च्या बस, खाजगी बस, खाजगी वाहने सतत उपलब्ध असतात.

रेल्वे मार्ग

जवळचे रेल्वे स्टेशन म्हेणजे सातारा ६० की.मी.अंतरावर आहे, पुणे १२० की.मी. मुंबई २७० की.मी. शिवाय कोकण रेल्वेचे खेडं स्टेशन 60 की.मी. अंतरावर आहे.

विमान सेवा

पुणे आणि मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमान तळ अनुक्रमे १२० कि.मी आणि २७० कि.मी.अंतरावर आहेत.

%d bloggers like this: