Haji Ali Dargah, Mumbai (हाजी अली दर्गाह,मुंबई)

Haji Ali Dargah, Mumbai

हाजी अली

हाजी अली पायवाट

भारत देशाचे मुंबई या आर्थिक शहरातील दक्षिणेकडील वरळीचे समुद्रकिनार्‍यावरील लहानशा बेटावर अतिशय प्रतिष्टीत आणि प्रसिद्ध ठिकाणी हाजी अली दर्गा (मशीद) आहे.हाजी आली दर्गा हा एक इंडो – इस्लामिक वास्तु कलेचा आदर्श सुंदर नमूना आहे. दंतकथेप्रमाणे दैवी निर्णय होऊन नशिबाचे साथीने ही वास्तु सय्यद पीर हाजी आली शाह बुखारी यांची समाधी निर्मिली आहे.

 

पार्श्व भूमी

हाजी आली दर्गा सन १४३१ मध्ये श्रीमंत मुस्लिम व्यापारी सय्यद पीर हाजी आली शाह बुखारी यांच्या स्मरणार्थ बांधला होता. त्यानि मक्काचे यात्रेस निघण्यापूर्वी त्याचेकडे असणारी सर्व जगभरातील सम्पत्ती बहाल केलेली होती. बुखारी यांनी १५ व्या शतकात बुखारा येथून निरोप घेवून उझबेकीस्थान वरून जगभर प्रवास करून मुंबई शहरात येऊन राहिले होते

बुखारी यांचे बाबत दंतकथा असी आहे की त्यांनी एकदा रस्त्यावर एक गरीब महिला हातात एक भांडे घेऊन रडत असताना पाहिली. त्यांनी तिला काय झाले असे विचारले. ती म्हणाली मी चालताना अडखळले आणि तेलाचे भांडे माझे हातातून पडले व सर्व तेल मातीत सांडले आहे. मी रिक्त हस्ते गेले तर माझा नवरा मला चाबकाने झोडून काढेल म्हणून भीती वाटते आहे. तेल कोठे सांडले ती जागा मला दाखव असे त्यांनी तिला संगितले. ती त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेली. त्यांनी तेथील मातीत जोरात आपली बोटे घुसविली. त्यातून तेल जोरात बाहेर आले. ते तिने आपल्या भांड्यात भरून घेतले आणि अतिशय आनंदाने घरी निघून गेली.

पुढील काळात अनेक कारणांनी ते अडचणीत आले आणि आजारीही पडले. नंतर ते मातेची परवानगी घेऊन भाऊ व इतर नातेवाइकासह भारतात मुंबईत वरळी येथे आले आणि सध्याच्या दर्ग्याच्या विरुद्द बाजूस राहिले. त्यांचा भाऊ परत गेला. त्याचेबरोबर यांनी मातेला पत्र दिले की मी आता माझे पुढील आयुष्यभर येथेच राहून इस्लाम धर्माचा प्रसार करन्यासाठी वेळ खर्च करणार आहे तेव्हा तू मला आता विसरून जा.

READ  Schools In Mumbai Maharahstra

त्यांनी त्यांचे मरणापर्यंत प्रार्थणा केली आणि जे जे भेटीसाठी येत त्यांना धर्माचे ज्ञान देणेचे काम केले. त्यांनी त्यांचे अनुयायांना संगितले की माझे मृत्यू नंतर माझे शरीराचे कोठेही दफन करू नका तर ती समुद्रात टाका आणि ज्यांना ती जेथे सापडेल त्यांना तिचे तेथे दफन करुद्या. त्यांची इच्छा अनुयायांनी पूर्ण केली. म्हणून त्यांचे शव ज्या ठिकाणी समुद्र किनार्‍या वरील लहानस्या बेटाला लागले तेथे हा दर्गा बांधला.

प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी या पवित्र ठिकाणी अगणित तीर्थयात्रेकरू, अनुयायी या दर्ग्याला भेट देतात. त्यांच्यात धर्म निरपेक्षता असते. आशीर्वाद मिळवण्यासाठी भेट देणारात भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. कांही शुक्रवारी येथे विविध सूफी संगीतकार या दर्ग्यामध्ये कव्वालीचा कार्यक्रम करतात.

रचना[

हा दर्गा वरळी येथील समुद्र तटापासून ५०० मीटर आत एका लहनशा बेटावरील खडकावर बांधलेला आहे. हा एक इंडो- इस्लामिक वास्तूकलेचा आदर्श नमूना आहे. हे बेट मुंबई शहराचे महालक्ष्मी मंदिराचे अगदी नजदीक म्हणजे एक की.मी. अंतरावर आहे.

हाजी अली दर्गा दर्गा ६०० वर्षे इतका पुरातन आहे. हा दर्गा वादळी वारे, खार्‍या पान्याची भारती ओहोटी आणि आठवडा भरातील साधारण ८०००० पर्यटक यांच्या रहदारीने झिजत आहे. सन १९६० आणि सन १९६४ मध्ये याचे नूतनीकरणाचे काम हाती घेतंले होते. बरेचसे वास्तुकाम २००८ मध्ये पूर्ण केले. त्यासाठी राजस्थान राज्यातिल मक्राना येथून सफेद मार्बल आणून त्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे सर्व दर्गा सफेद आहे. ताजमहाल हॉटेल साठी तेथूनच मार्बल मागविलेला होता

हाजी आली जन आंदोलन

भारतीय मुस्लिम महिला आंदोलकांनी हाजी अली सर्वासाठी हे आंदोलन छेडले भूमाता ब्रिगेड ने देखील या दर्ग्यात हवे तेथे सर्वांना प्रार्थणा करण्याचा हक्क मिळाला पाहिजे असे आंदोलन छेडले. दी.२६-८ रोजी मुंबई हाय कोर्ट ने महिलाना दर्ग्यात प्रवेश देण्याचा निर्णय दिला. या दर्ग्याचे ट्रस्टला सुप्रीम कोर्टाने २४ ऑक्टोबर रोजी महिलाना दर्ग्यात प्रवेश देण्याबाबात आदेश दिला.

READ  Vithoba temple, Pandharpur (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर,पंढरपूर)

धर्म प्रसिद्धी

“हाजी आली दर्गा” यावरील “फिजा” या सिनेमात “पिया हाजी आली” हे गीत खूप प्रसिद्ध झालेले आहे.

 

%d bloggers like this: