Vishrambag Wada, Pune, Maharashtra

Vishrambag Wada, Pune

 

पुण्यातील विश्रामबाग वाडा

विश्रामबाग वाडा हा मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता. इ.स. १८०७ साली सुमारे ३.५ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसर्‍या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसर्‍या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेर्‍या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.

नगरपालिकेचे कार्यालय

दुसर्‍या बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या विश्रामबागवाड्याची १८०८ मध्ये वास्तुशांत झाल्याच्या नोंदी मिळतात. शहराच्या मध्य भागातील हा ऐसपैस वाडा आणि त्याच्या दर्शनी भागाचे सुरुवातीपासून सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ब्रिटिशांच्या कालखंडात त्यांनी हा वाडा तब्बल एक लाख रुपयांना पुणे नगरपालिकेला विकल्याची नोंद आढळून येते. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधून होण्यापूर्वी नगरपालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबागवाड्यामध्येच होते.

सांस्कृतिक केंद्र

पुणे महापालिकेतर्फे विश्रामबागवाड्यात एक ‘कल्चरल सेंटर’ उभारण्यात आले आहे. नेपथ्याचा वापर करून संगीत-नाट्य-कला प्रांतातील कलावंतांना आता पुणेकरांसमोर कलाविष्कार सादर करण्यासाठी हा एक रंगमंस उपलब्ध आहे. दगडाचे बांधीव स्टेज उभारण्यात आले असून शेजारी एक ‘ग्रीन रूम’ आहे. या स्टेजवरून तासा-दीड तासाचे लहान कार्यक्रम होऊ शकतात.,

READ  JAWHAR PARYATAN MAHARASHTRA HILL STATION 
%d bloggers like this: