अंजनेरी किल्ला Anjaneri Fort

Anjaneri Fort Maharashtra Tourism

 

इतिहास :
वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे.

अंजनेरी किल्ला Anjaneri Fort – ४२०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे.
वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.

anjaneri

                           anjaneri

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात.
ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते.
मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात.
एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते.
डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे.
यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे.
समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे.
किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.

गडावर जाण्याच्या वाटा :

किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावरील फाट्यावर उतरावे.
या फाट्यापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे.
गावातून नवरा-नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते.
पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.
पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची सोय होते. २. सीता गुंफेत सुद्धा १० ते १२ जणांची सोय होते. जेवणाची सोय आपणच करावी.
मंदिराजवळच बारामाही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे. अंजनेरी गावातून पोहोचायला २ तास लागतात.

READ  किल्ले रोहीडा Rohida Fort

अंजनेरी हा नाशिक – त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्वाचा किल्ला आहे. नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.

 

%d bloggers like this: