किल्ले तोरणा /प्रचंडगड Torana Fort

Torana Fort Maharashtra Tourism

 

तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला सर्वात उंच डोंगर. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या पहिल्या काही किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रिच्या रांगेतून दोन पदर निघुन पुर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. इतिहास शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. पुण्याच्या नैऋत्येस पर्वतराजीमध्ये उत्तर अक्षांश व पुर्व रेखांशावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी तर उत्तरेस कानद नदिचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेस कानद खिंड तर पुर्वेस बामण व खरीव खिंडी आहेत. हा किल्ला कधी व कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या व मंदिरांच्या अवशेशावरुन हा शैवपंथांचा आश्रम असावा. इ.स. १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीत मालिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहित गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व त्याचे नांव प्रचंडगड असे ठेवले. गडावर जाण्याच्या वाटा स्वारगेट बसस्थानकावरुन जाणा-या रा.प. मंडळाच्या गाड्या किंवा खाजगी वाहन. गडावर जाणारी

वाटः कठीण – राजगड

मार्गे – तोरणा

torana fort

                          torana fort

उंची : १४०० मी.

प्रकार : गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी : मध्यम

ठिकाण : पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत

जवळचे गाव : वेल्हा

डोंगररांग : पुणे

 

READ  किल्ले रायगड Raigad Fort
%d bloggers like this: