Rajiv Gandhi Zoological Park, Pune, Maharashtra

Rajiv Gandhi Zoological Park, Pune

कात्रज सर्पोद्यान हे पुण्यात भारती विद्यापीठाजवळ पुणे सातारा महामार्गावर कात्रज येथे वसलेले आहे. इ.स. १९८६ मध्ये नीलम कुमार खैरे यांनी ते वसवले.ते सर्पोद्यानाचे पहिले संचालक होते. सर्व जातींचे सर्प, सरपटणारे प्राणी आणि प्राणिजगतातल्या अनेक जीवांना येथे संरक्षण देऊन त्यांचे जतन व संवर्धन केले जाते. इ.स. १९९९ मध्ये या सर्पोद्यानाचा राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्रात समावेश केला गेला जे की पुणे महानगरपालिकेतर्फे व्यवस्थापित केले जाते.सापासारख्या प्राणघातक समजल्या जाणार्‍या प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करून सापाबद्दल त्यांच्या मनात असलेली अज्ञात भीती काढून टाकून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी ही संस्था अनेक कार्यक्रम आयोजित करते.

पर्यटक सेवा/ सुविधा | Pune Municipal Corporation

प्राणीसंग्रहालयाची वेळ

१ एप्रिल ते १५ जून – स. ९.३० ते सायं. ५.३०

(प्राणीसंग्रहालय प्रवेशद्वार सायं. ६.३०  वा. बंद)

१६ जून ते ३१ मार्च – स. ९.३० ते सायं. ५.००

(प्राणीसंग्रहालय प्रवेशद्वार सायं. ६ वा. बंद)

 

तिकीट दर

 1. क्र.

प्रवेश तपशील

तिकीट दर (रुपये)
प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे)

२५/-

लहान मुले (उंची ४ फूट ४ इंच पर्यंत)

१०/-

विदेशी नागरिक (Foreigner )

१००/-

अंध व अपंग

मोफत

विद्यार्थी (शैक्षणिक सहल- शिक्षकांसह)

अ) खासगी शाळांमधील विद्यार्थी

आ) मनपा शाळा, जिल्हा परिषद व शासकीय शाळांचे विद्यार्थी

१०/-प्रत्येकी

०५/-  प्रत्येकी

स्टील कॅमेरा

५०/-

व्हिडिओ कॅमेरा

२००/-

गाईड उपलब्धतेनुसार (प्रत्येक समूह)

५०/-

बटरी ऑपरेटेड वाहन शुल्क

प्रौढ (उंची ४ फूट ४ इंच व त्यापुढे)

४०/-

१० लहान मुले (उंची ४ फूट ४ इंच पर्यंत)

२५/-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दर बुधवारी प्राणीसंग्रहालय बंद राहील.

बसचे मार्ग

 • स्वारगेट बस स्थानकावरून कात्रजकडे येणारी कोणतीही बस- बस नंबर १०३, ४२, ३०१ इ.
 • शिवाजीनगर बस स्थानकावरून कात्रजकडे येणारी कोणतीही बस- बस नंबर २
 • पुणे स्टेशन बस स्थानकावरून कात्रजकडे येणारी कोणतीही बस- बस नंबर २४

प्राणी संग्रहालयामध्ये खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

 • प्राणी संग्रहालयातील कोणत्याही प्राण्याला चिडविणे, इजा पोचविणे, खाऊ घालणे किंवा गोंधळ घालून त्रास देणे किंवा कचरा फेकणे कायद्याने गुन्हा आहे. असे करणार्यांना केंद्र सरकारच्या वन्यजीवन(संरक्षण) कायदा 1972(दुरुस्ती 1991) मधील कलम ३८ ज. विभाग 51(1-ब) नुसार 2000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा/आणि सहा महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.
 • Use of plastic is banned in the zoo so please carry your eatables in cloth or paper bags.
 • प्राणी संग्रहालयात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आहे. सोबतचे खाद्यपदार्थ कागदी किंवा कापडी पिशवीमध्ये आणावेत.
 • बाटली वापरण्यासाठी १० रुपये डिपॉझिट भरुन त्याची पावती घ्यावी. परत जाताना ही पावती दाखवून डिपॉझिट परत केले जाईल.
 • प्राणी संग्रहालयाच्या आवारात गुटखा आणि सिगरेटला बंदी आहे.
 • आग पेटवणे किंवा अन्न शिजवण्यास बंदी आहे
 • स्फोटके, शस्त्रे किंवा फटाके बाळगण्यास बंदी
 • उद्यानात जोरात गाणी लावून किंवा खेळ खेळून पर्यावरणात व्यत्यय आणू नका
 • उद्यानात पाळीव प्राण्यांना परवानगी नाही
 • प्राणी संग्रहालयातील मालमत्तेचे नुकसान करणे कायद्याने गुन्हा आहे
 • फुलांना झाडांवरच राहू द्या
 • नो एंट्री परिसरात जाऊ नका
 • नेमून दिलेल्या रस्त्यांवर चाला आणि बसण्यासाठी उपलब्ध जागांचाच वापर करा
 • तुमच्यासोबत आलेली लहान मुले आणि सामानाची काळजी घ्या
 • माहितीफलकावर दिलेल्या सूचनांचे पालन करा
READ  Lal Mahal Pune, Maharashtra
%d bloggers like this: