माझे आवडते संगीतकार

माझे आवडते संगीतकार

 

“रोजा”, “बॉम्बे”, “दिल से” सारख्या संवेदनशील चित्रपटांच्या संगीतामुळे हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांची ओळख झाली. ‘ताल’ सारख्या ठेका धरायला लावणाऱ्या संगीतामुळे ते लोकप्रिय झाले आणि ‘जय होsss!’ च्या वेळेस तर त्यांनी पुर्ण जगाला आपल्या संगीताने वेड लावले.

१९९० मध्ये त्यांनी आपल्या संगीत काराकिर्दीची सुरुवात केली आणि इतक्या कमी काळात त्यांनी १३ फिल्म-फेअर, ४ नॅशनल, १ बाफता, १ गोल्डन ग्लोब आणि ३ ऍकेडमी पारीतोषीक पटकावली.

सर्व तरूणाईच्या गळ्यातले ताईत बनलेले, मितभाषी, थोडेसे लाजाळु असे अल्लाह रखा रहमान, अर्थात ‘ए. आर. रहमान’ हेच माझे आवडते संगीतकार आहेत.

‘ए. आर. रहमान’ यांचा जन्म चैन्नई मध्ये एका मुडलीयार-तामीळ कुटुंबात झाला. त्यांचे वडील आर.के.शेखर हे सुध्दा चैन्नईमधे संगीत क्षेत्रातच कार्यरत होते. ‘ए. आर. रहमान’ यांच्या तरूणपणीच त्यांच्या वडीलांचे छ्त्र हरपले आणि घर चालवण्यासाठी त्यांना घरातील संगीत-उपकरणे भाड्याने द्यावी लागली. ‘ए. आर. रहमान’ यांना त्यांच्या मातोश्री- करीमा यांनी मोठे केले.

लहानपणापासुनच ‘ए. आर. रहमान’ यांना संगीताचे वेड होते. वयाच्या ११व्या वर्षीच इलयराजा यांच्या संगीतकांमध्ये त्यांचा समावेश झाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळुन बघीतले नाही.

संगीतामध्ये तांत्रीक-क्रांतीचा, संगणकाचा, अनेक तुकड्यांत संगीत ध्वनीमुद्रीत करुन ते एकत्र जोडण्याचा पायंडा ‘ए. आर. रहमान’ यांनीच पाडला आणि एका वेगळ्याच संगीत-क्षेत्राची मुहुर्त-वेढ त्यांनी रोवली असे म्हणल्यास ते वावगे ठरु नये.

एक-दोनदा हुलकावणी दिलेल्या आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार पहिल्यांदा भारतात आणले ते आपल्या ‘ए. आर. रहमान’ यांनीच.

जगभरात भारताचे नाव दैदीप्यमान करणारे ‘ए. आर. रहमान’ हेच माझे आवडते संगीतकार आहेत यात शंकाच नाही.

READ  मराठी निबंधाचे प्रकार – Types of Marathi Essays
%d bloggers like this: