माझ्या शाळेची सहल

माझ्या शाळेची सहल

माझ्या शाळेची सहल खरतर शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी एक जीव्ह्याळ्य। चा विषय .
माझ्या शाळेची सहल खरंतर फार वेळा बाहेरगावी गेली नाही . माझ्यामते तरी आम्ही “फक्त ” २ -३ वेळाच सहलीला बाहेरगावी गेलो असू .
पण आजही प्रत्येक सहलीतला प्रत्येक दिवस अगदी तसाच्या -तसा माझ्या लक्षात आहे .
परंतु आज मी माझ्या सर्वात आवडत्या सहली बद्दल लिहिणार आहे ,
महाबळेश्वरची सहल …..

आजही मला अगदी स्पष्टपणे आठवतेय ,सहल जायच्या साधारण १ महिना आधी आमच्या वर्गात सहलीची सूचना आली आणि मग काय सगळीकडे एकच विषय “सहल “. प्रत्येकाच्या मनात अगदी आनंदाच कारंज फुटला होता ,आमच्या ग्रुपने तर सगळ्यात आधी जाऊन फी भरली आणि मग काय प्रत्येक जण अगदी आतुरतेने ट्रीप च्या दिवसाची वाट पाहत होतो .

आणि अखेर तो दिवस उजाडला ;अर्थात ,सहलीच्या आधीच्या रात्री सहलीच्या excitement मुळे झोप आलीच नव्हती पण
तरीही सकाळी ५ वाजता तयार होऊन आम्ही सगळे ग्राउंड वर जमलो . बसेस आमच्या आधीच तयार होऊन आमची वाट पाहत उभ्या होत्या
मग काय पळतच जाऊन आपापली आणि मैत्रिणीची सीट पकडली आणि थोड्याच वेळात प्रवासाला सुरुवात झाली आणि कमालीची गोष्ट म्हणजे इतकी सकाळची वेळ असूनही प्रत्येकजण अगदी उत्साहाने भरून होता  नंतर आम्ही अंताक्षरी ला सुरुवात केली अगदी वाई येई पर्यंत प्रत्येकजण फुल टू गाणी म्हणण्यात दंग होता
वाईत गणपती बाप्पाच दर्शन घेऊन आम्ही फोटो काढायचा श्रीगणेशा केला मग काय अखंड ट्रीप मध्ये अखंड फोटो सेशन चालूच होता .बाकी ट्रीप पण अविस्मरणीय होती ज़ुन महाबळेश्वर ,प्रतापगड ,थोडेफार पॉईनट्स असा सगळा बघता बघता दिवस कसा सरला हे कळलाच नाही

दिवसभराच्या श्रमामुळे,मस्ती मुळे  जेवण करून गाडीत बसल्या बसल्या झोपेन प्रत्येकाला आपल्या कुशीत घेतला आणि परत कसे आलो हे कळलाच नाही

खरंतर ती होती  फक्त सहल पण माझ्या जीवनातील आठवणीचा एक खूप मोठा कप्पा तिने स्वत :साठी reserve केलाय
हे सगळा आठवायचं कारण म्हणजे नुकताच प्रतापगडावर एका शाळेची सहल पहिली आणि मन भुर्रकन उडून भूतकाळात गेल
मी परत १ २ -१ ३ वर्ष्यांची होऊन गेले आणि मलाच शोधू लागले खरी पण मला मीच सापडले नाही कुठ … 🙁

खरंतर आपल जीवन पण या सहली सारखच असत ,नाही का ??
लोक  ,कष्ट ,तयारी हे कुठतरी अस्पप्ठ होत जातात पण आठवणी त्या तश्याच राहतात  ; चिरंतन

%d bloggers like this: