मुख्याध्यापकास पत्र

मुख्याध्यापकास पत्र

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेतील शिक्षकांनी उत्कृष्ट तयारी करून घेतली, म्हणून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने लिहा.

 राजेश कोलते
खेडकर नगर,
गणपती मंदिराजवळ
जिल्हा – अकोला
दि. २-२-२०१५
माननीय मुख्याध्यापक,
मुक्ताई माध्यमिक प्रशाला,
आळंदी (देवाची), पुणे – ४१२ १०५

विषय : परीक्षेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी.
महोदय,
सादर प्रणाम.

परवा १८ फेब्रुवारीला आमची सातवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा झाली. आपल्या शाळेतून आम्ही वीस विद्यार्थी बसलो आहोत. या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी हे पत्र लिहीत आहे.
सर, आम्हांला सर्वांना पेपर्स अतिशय चांगले गेले. आम्ही दिलेल्या वेळांत सर्व प्रश्न सोडवू शकलो. याचे श्रेय आम्हांला शिकवणाऱ्या गुरुजनांकडे जाते. श्री. देसाई सर, श्री. महाले सर व सौ. नाचणेबाईंनी आमची खूपच चांगली तयारी करून घेतली होती. त्याबद्दल आम्ही सर्वजण कृतज्ञ आहोत. आपले आभार मानून पत्र पूर्ण करतो.
तसदीबद्दल क्षमस्व.

आपला नम्र विद्यार्थी,
राजेश कोलते

READ  संगणक माझा सोबती
%d bloggers like this: