चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण…

चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण…

अन्न शिजवण आणि खाणं टाळलं पाहिजे.

चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण...

नवी दिल्ली : आषाढ महिन्याची पोर्णिमा म्हणजे २७ जुलै २०१८ ला वर्षातील सर्वात मोठ चंद्र ग्रहण होतयं.  वैज्ञानिक दृष्टीकोनातून या पूर्ण चंद्र ग्रहणास ‘ब्लड मून’ (Blood Moon) देखील म्हटले जाते. १ तास ४३ मिनिटे हे ग्रहण सुरू राहणार आहे. केवळ भारतच नव्हे तर आस्ट्रेलिया, आशिया, आफ्रीका, यूरोप आणि अंटार्टीकामध्येही हे चंद्रग्रहण असणार आहे.  हिंदू शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीवर १०८ दिवस दिसतो. अशावेळी काही काम टाळणं हेच चांगल असत. हे चंद्रग्रहण १०४ वर्षानंतर होत असून याची सावधनता बाळगणं गरजेच आहे. यावेळी अन्न शिजवण आणि खाणं टाळलं पाहिजे.

अन्न खराब होण्याची भीती 

चंद्र ग्रहणादरम्यान अन्न शिजविणे किंवा खाणं टाळलं पाहिजे. चंद्र ग्रहणादरम्यान वायुमंडलात बॅक्टेरीयाचे प्रमाण वाढते. यामुळे शिजवलेलं जेवणं खराब होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी जेवल्यास आजाराला कारण मिळतं.

शरीराला नुकसान 

चंद्र ग्रहणादरम्यान अन्न खाल्ल्यास शरीरभर सुस्ती येते. या भोजनाने शरीरभर परिणाम केल्यास मृत्यू येण्याची शक्यताही असते.  ग्रहणादरम्यान शिजवलेले अन्न क्षणात खराब होऊ शकतं.

गर्भवती महिलांवर परिणाम 

एका संशोधनानुसार चंद्र ग्रहणाचा मानव प्रजनन, विशेषत: प्रजनन क्षमता,जन्म प्रमाण, मासिक पाळीवर याचा परिणाम दिसतो. गर्भवती महिलांनी चंद्र ग्रहणात बाहेर फिरणं टाळलं पाहीजे. हार्मोनल बदलामुळे शरीरात अस्वस्थता, घाम, भीती आणि थकवा जाणवू लागतो. एवढंच नव्हे तर रक्तदाबाची समस्याही जाणवू लागते.

झोपेवर वाईट परिणाम 

चंद्र ग्रहणाचा झोपेवर परिणाम दिसून येतो. अशावेळी लोकांना झोप टाळण्याचा सल्ला दिला जातो.  चंद्र ग्रहणामुळे व्यक्तीला नीट झोप येत नाही आणि शरीरात थकवा जाणवतो.

रक्तदाब 

चंद्राच्या प्रभावाचा शरीरावर उलट परिणाम जाणवतो. यादरम्यान रक्तदाबामध्ये चढउतार  आणि हृदयाचे ठोके वाढलेले जाणवतात.

READ  दही-भात खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे
%d bloggers like this: