तेलकट त्वचेसाठी जादूई ठरतो पुदीन्याचा फेसपॅक

तेलकट त्वचेसाठी जादूई ठरतो पुदीन्याचा फेसपॅक

आहारात पुदिन्याचा वापर करणं फायदेशीर आहे.

  
तेलकट त्वचेसाठी जादूई ठरतो पुदीन्याचा फेसपॅक

मुंबई : आहारात पुदिन्याचा वापर करणं फायदेशीर आहे. हे तुम्हांला ठाऊक असेल. नेहमीच्या वाटपापासून ते अगदी मिंट मोहितोसारख्या ड्रिंकमध्ये आपण हमखास पुदीन्याचा वापर करतो. पुदीना थंड प्रवृत्तीचा आणि रेचक असल्याने पचनकार्य सुरळीत करण्यासाठी त्याचा हमखास वापर केला जातो. पण हाच पुदीना त्वचेला खुलवण्यासाठीदेखील केला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का?

आरोग्यदायी पुदीना  

पचनक्रिया सुधारण्यासोबतच तोंडातील दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठीदेखील पुदीना फायदेशीर ठरतो. त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील पुदीन्याचा वापर केला जातो.

त्वचेसाठी पुदीना कसा ठरतो फायदेशीर ?

पुदिन्याच्या पानांमध्ये मिन्थॉल आणि अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. उन्हात फिरल्यामुळे त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पुदिना फायदेशीर ठरतो. चेहर्‍यावर अ‍ॅक्ने, ब्रेकआऊट्स, सनबर्न, त्वचा लालसर होणं, रॅशेस येणं अशा समस्यांवर ते परिणामकारक ठरतं. त्वचाविकारांना दूर ठेवण्यासाठीदेखील पुदीन्याची पानं फायदेशीर आहेत.

कसा कराल पुदीन्याच्या पानांचा समावेश? 

त्वचेसाठी मुलतानी माती गुणकारी आहे हे तुम्हांला ठाऊकच आहे. प्रामुख्याने तेलकट त्वचा असणार्‍यांमध्ये त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात. त्वचेतील तेल दूर करण्यासाठी, क्लिंजिंगसाठी मुलतानी मातीसोबतच पुदीनाही फायदेशीर ठरतो.

मुलतानी माती, ताजी पुदिन्याची पानं, मध आणि दही एकत्र करा. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटं त्वचेवर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याच्या मदतीने हा पॅक काढून टाका. या पॅकमुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते.

गुलाबपाणीदेखील त्वचेची पीएच व्हॅल्यू सुधारण्यास मदत करतात. यामधील दाहशामक गुणधर्म त्वचेचे सौंदर्य खुलवते. पुदीन्याच्या पानांसोबत मध आणि गुलाबपाणी मिसळणंदेखील फायदेशीर आहे. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

READ  चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण...
%d bloggers like this: