Marathi Suvichar Random

Marathi Suvichar Random

Marathi Suvichar

आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,
कधी ना कधी हरावच लागतं…
आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही…
परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,
कधी न कधी मरावच लागत…
सुखत निद्रा…!!


मैत्री पासून आपलं नातं सुरु झालं
अनोळखी आपण एक मेकांशी बोलू लागलो
मैत्रीच नातं कधी घट्ट झालं हे कळलच नाही
मैत्री अशी होती कि सर्व गोष्ठी एकमेकांशी वाटू लागलो
मैत्री तुझी मला खूप आवडते
पण मन माझं कधी तुझ्या प्रेमात रंगायला लागलं कळलंच नाही
जेव्हा पासून आयुष्यात आलीस
त्या दिवसा पासून माझं आयुष बदलूनच गेलं
आता तुझी सवय झाली आहे मला
जेव्हा तुला भेटतो तेव्हा खूप छान वाटतं
तुझ्याशी दूर जावंसं वाटतच नाही
आणि तुला एक दिवस नाही भेटलो
तर मनात सारखं तुझाच विचार चालू असतो
तू समोर असलीस कि तुलाच बघावसं वाटतं
तू लांब असलीस कि नझर तुलाच शोधत असते
माझं दिवस तुझ्या पासून सुरु होतो
आणि रात्र तुझ्या आठवणीत संपते
आता तर माझं आयुष्य तुझ्या विना अधुरच आहे
मनापसून प्रेम करतो तुझ्यावर
पूर्ण आयुष्य जगायचा आहे तुझ्याच बरोबर
तुला खूप खुश ठेवायचं आहे आणि तुझं आयुष्य आनंदाने
फुलवायचं आहे
पण तुझं मनात देखील तेच आहे जे माझ्या मनात आहे हे
मला माहित नाही;-)


ज्या व्यक्तीवर आपला सर्वात जास्त जीव असतो,,
शेवटी
ती च व्यक्ती आपला जीव घेते….!!


अन प्रेम करायच राहुनच गेलं…
तिच्या घरच्यांशी असनारी जवळीक,
प्रेमाच्या आड येउन बसली..
जीव तिच्यावर जडुनही,
मनाला मुरड आम्ही घातली..
मनं मारायचं कामच आम्ही उभ्या आयुष्यात केलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं…
तिचा होकार असतानाही,
तिच्या घरच्यांचाच विचार केला..
सारा विचार करुन,
तिला नकारचं दिला..
उपकारांच्या ओझ्याखाली,
त्यांनी आम्हाला खोलवर गाडलं..
अन प्रेम करायच राहुनच गेलं…
एक नाते जोडावे कि
चार नाती तोडावी..
हे आम्हाला कधी, समजलेच नाही..
झाडाचा बुंधा सोडून फांद्याशी नाते जोडने, जमलेही नाही..
फुलण्या आधिच कळ्यांना (प्रेमाला) कोमेजताना पाहिलं,
अन प्रेम करायच राहुनच गेलं…


|| आई ||
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
आई म्हणजे असतो
एक घराचा आधार
आई विना ते गजबजलेले
घरच असते निराधार
आई च्या एक हाकेत
ते घर सारं मावतं
मन-आधारा च्या पोटी
सारयांना आई च घर दावतं

आई च्या हाताला
असते चव लई भारी
आई चा हाताने
खाण्याची बातच हो न्यारी
.
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
.
आई चा राग म्हणजे
बेभान ढगांचा गडगडाट
अवघड असते खुप
तेव्हा सापडणे आपली वाट
.
सोसताना वेदना
मुखातून एक शब्द नेहमी येई
प्रेमाचा पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई …


हे मन आज एकांतात
उगीचच रडत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी- कधी ….
तूझं ते माझ्यावर रागावणं,
आणि मी रागावले तर झटक्यात मला मनवणं,
ती एक-एक आठवण, मनाला आज सलत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी-कधी ….
तूझं ते मला भेटण्यासाठी बोलावणं,
आणि मी “नाही” म्हणताच, अल्लड पणे हट्ट धरणं,
तूजा तो हट्ट आजही माझ्या स्मरणात आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे.
कधी- कधी ….
तूझं ते माझ्यासाठी वाट पाहणं,
मी उशिरा आले कि माझ्यावर ओरडणं,
पण माझ्या एका …..,sorry मुळे
तूझा तो राग “स्मित हास्यात” विरून जाणं,
आजही ते हसू माझ्या
आठवणीत आहे,
तू माझ्या जवळ नाहीस
याची जाणीव छळत आहे….


काही भाव बोलून जातात,
तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो.
ओली हवा धूंद करते,
ती साद नुसत्या हवेत नसते.
काही नाती ओढ लावतात,
ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते.
प्रत्येक नाते प्रेमाचे हवे,
अशी काहीच गरज नसते,
तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे,
याला खूप महत्व असते..


सगली जण ‪#‎दिवाळी‬ ला काहीना काही नवीन घेतात.. मी पण विचार करतोय.
एखादी नविन Item काढायचीं.


मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,

मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची


श्वासांत रोखूनी वादळ्, डोळ्यांत
रोखली आग; देव आमुचा छञपती,
एकटा हिंदु वाघ;हातात धरली तलवार,
छातीत भरले पोलाद; धन्य-धन्य
हा महाराष्ट्र,
धन्य हे आपले महाराज ||
॥मुजरा’राजे’मुज -रा॥
॥जय भवानी जय शिवाजी ॥


लोकांन बरोबर किती छान वागा तरी ते आपला वापर त्याचा गरजेनुसार आणि मुड नुसारच करतात.


पत्ते कितीही उलट सुलट पिसले तरी , ‎राणी‬ शेवटी ‪#‎बादशाहचीच‬ असते ….


प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न
हरवणारी जीवनाची वाट. .
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर
प्रश्न. .
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
नेहमी ऊगवणारी सुंदर सकाळ
हवीहवीशी वाटणारी रम्य
संध्याकाळ ..
प्रेम म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेला
एकदा घेतला तरी बस्स
असा अमृतप्याला .. .
ऐकत रहावी अशी हरीची बासरी
अस्मानीची असावी जशी एक परी.


प्रेम” हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही……..!!!
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही……!!! आणि……..
.
जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही.


काही माणसे खुप हवीशी वाटतात..घालवलेले प्रत्येक क्षण आठवणीत रुतून बसतात..अचानक वेळचे आणि काळाचे गणित जुळते क्षणात नजरे समोर ती परकी होवुन जातात..

 

READ  Marathi Good Morning Status
%d bloggers like this: