संशोधक चंद्रशेखर रामन

संशोधक चंद्रशेखर रामन मराठी निबंध

दि. ७ नोव्हेंबर १८८८ रोजी त्यांचा जन्म झाला.१९०० साली वयाच्या १२ व्या वर्षी ते मैट्रिक झाले. १९०४ मध्ये बी. ए. व १९०७ मध्ये एम. ए. झाले. गणित व भौतिकशास्त्र हे त्यांचे विषय व त्यात त्यांनी पहिला वर्गात पहिला क्रमांक मिळविला. यावरून त्यांची निसर्गदत्त बुद्धिमत्ता दिसून येते. त्यांचे अनेक लेख इंग्लंडमधील वृत्तपत्रात, मासिकात प्रसिद्ध झाले. १९२१ सालच्या कॉमनवेल्थ विश्वविध्यालयाच्या परिषदेत त्यांनी कलकत्ता विध्यापिठाचे प्रतिनिधित्व केले.

क्वांटम सिद्धांताला बळकटी देणारा शोध म्हणजे विधुतचुंबकीय प्रारणाचा कण – प्रोटॉन आपली सर्व ऊर्जा इलेक्ट्रोनला देऊ शकतो,यावर भारतीय संशोधक चंद्रशेखर रामन यांनी केलेले संशोधन अतिशय महत्वाचे ठरले व फार उपयोगी सिद्ध झाले. पारदर्शक पदार्थातून जवळपास एकाच तरंगलांबीच्या म्हणजे एकाच रंगाच्या प्रकाशाचे विकरण झाल्यास त्यात मुळच्या तरंगलांबीच्या म्हणजे एकाच रंगाच्या प्रकाशाचे विकरण झाल्यास त्यात मुळच्या तरंगलांबीपेक्षा अधिक इतर तरंगलांबीचे किरणही आढळतात हा शोध त्यांनी लावला व त्याचा अर्थही लावला.

पदार्थातील रेणू आपल्या आसाभोवती वेगाने गिरक्या घेत असतात. तसेच रेणूमधील अणूंची एकमेकांच्या संदर्भात जलद कंपनेही होत असतात. त्या गिरक्यात कंपनेही असतात. त्या कंपन्यात ऊर्जा असते. या ऊर्जेची देवाणघेवाण झाल्यामुळे प्रकाशाच्या तरंगाची लांबी कमी जास्त होऊ शकते. या वाढ -घटीचे अचूक मोजमाप घेऊन रेणूच्या संरचनेचा चांगला अभ्यास करता येतो.

रामन परिणाम वापरून रेणूच्या संरचनेची धाटणी ठरविण्याचे काम अनेक शास्त्रज्ञाना प्रेरणादायक ठरले. दोन पिढयापुर्वीचे भौतिकशास्त्रज्ञ एकतर त्यांचे विध्यार्थी होते व त्यांचे विध्यार्थी होते वा त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेले होते. ध्वनिशास्त्रातही त्यांनी मुलभूत काम केले. डोळ्यांना रंग कसे दिसतात,आकाशांना रंग नीळा का? असल्या रहस्यमय कठीण प्रश्नांची उकल करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. या संशोधनाकार्याबद्दल १९३० सालचा नोबेल पुरस्कार त्यांना गौरवपूर्वक बहाल करण्यात आला. तर १९५४ साली त्यांना भारतरत्न हा नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

READ  डॉ. विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम

असा हा फुले, मुले,ग्रहगोल,तारे,रंगबिरंगे खडे,हिरे मोती यांचे आकर्षण असणारा बुदिमान, गानलुद्ध रसिक,सहॄउदयी, उधारमतवादी विज्ञानवेत्ता २१ नोव्हेंबर १९७० साली समाधिस्थ झाला.

%d bloggers like this: