विशेषण

विशेषण

विशेषण

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण (‘विशेष्य’) असे म्हणतात.

उदा.
रमेश चांगला मुलगा आहे.

वरील वाक्यात मुलगा बद्दल विशेष माहिती देण्यात आली आहे.
मुलगा कशा? – चांगला (‘मुलगा’ या नामाबद्दल विशेष माहिती.)

गुण विशेषण

ज्या विशेषणांच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण अथवा विशेष दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात.

उदा:
निरोगी मुले खेळत आहेत.

वरील वाक्यात निरोगी या शब्दाने मुलेचा गुण सांगितला आहे.

संख्या विशेषण

ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दर्शविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात.

उदा.
देशातील प्रत्येक मुलाला मर्दपणाचे आहे.

वरील वाक्यात प्रत्येक या शब्दाने मुलासांची संख्या दर्शवली आहे.

संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत:

(1) गणनावाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्यास गणनावाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा.
आठ मनुष्य, शंभर सायकली

(2) क्रम वाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखविण्यासाठी केला जातो त्यास क्रम वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा.
पाचव्या मुलगी, आठव्या मजला

(3) आवृत्ती वाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषणाचा उपयोग “किती वेळा” याचा बोध करण्यासाठी केला जातो त्यास आवृत्ती वाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा.
दहापट रक्कम, सात वेळा

(4) पृथकत्ववाचक संख्या विशेषण :
ज्या विशेषणाचा उपयोग वेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो त्यास पृथकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा.
एकेक मुलगा, तीन – तीनची तुकडी

(5) अनिश्चित संख्या विशेषण :
जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यास अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात.
उदा:
थोडा वेळ, अधिक पैसे

सार्वनामिक विशेषण

जी विशेषणे सर्वनामांपासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना “सार्वनामिक विशेषण” म्हणतात.

उदा:
मी : माझा, माझी, माझे
तू : तुझा, तुझी, तुझे

झाडावरचा तो पक्षी गात होता.

नामसाधित विशेषण

वाक्यामध्ये नामाचा उपयोग विशेषणासारखा होतो त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात.

उदा:
तो गाडी विक्रेता आहे.
(गाडी- मुळ नाव, विक्रेता – नामाबद्दल विशेष माहिती)

धातुसाधित विशेषण

एखाद्या वाक्यामध्ये नामची विशेषणे हि क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात अशा विशेषणाला धातुसाधित विशेषण म्हणतात.

उदा:
ती धावणारी मुलगी बघा.
(धावणारा शब्द मुलगा नामाची विशेषण आहे. त्याचे मुल रूप धाव या क्रियापदाच्या मूळ शब्दापासून तयार झाले आहे.)

अव्ययसाधित विशेषण

वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्याला अव्ययसाधित विशेषणे म्हणतात.

उदा:
समोरची दार बंद आहे.
(समोर या शब्दाला ची हा प्रत्यय लागला आहे.)

READ  प्रयोग मराठी
%d bloggers like this: