शब्दविचार

शब्दविचार

 

शब्द आणि पद :

शब्दविचार तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे ध्वनी आपण कागदावर लिहून दाखविताना विशिष्ट चिन्हे दाखवितो, वापरतो. हे ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असे म्हणतो. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे,म्हणून ‘बदक‘ हा शब्द तयार झाला.

एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.’ बदक पाण्यात पोहते. ‘ हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पद व शब्द यांत थोडा फरक आहे. ‘ पाणी’ हा शब्द आहे. ‘पाण्यात‘ हे पद आहे.

वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरुपात बदल करुन त्या शब्दाचे जे रुप तयार होते, त्यास पद असे म्हणतात, पण व्याकरणात पदांना देखील स्थूलमानाने ‘शब्द’ असे म्हटले जाते. ’स्वातीने’ हे पद आहे. यात मूळ शब्द ‘स्वाती‘ आहे.

मूळ शब्दाला व्याकरणात ‘प्रकृती‘ असे म्हणतात. ‘ने’ हा प्रत्यय लागून ‘स्वातीने’ हे जे रुप झाले त्याला ‘विकृती’ असे म्हणतात. विकृती म्हणजे शब्दांच्या मूळ रुपाचे बदललेले रुप. यालाच ‘पद’ असे म्हणतात. वाक्य हे शब्दांचे किंवा पदांचे बनलेले असते.


 

READ  मराठी संज्ञा
%d bloggers like this: