सर्वनाम

सर्वनाम

सर्वनाम
वाक्यात वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा उपयोग केला जातो, त्याला सर्वनाम म्हणतात.

मराठीत एकंदर नऊ सर्वनामे आहेत.
तू, मी, तो, हा, आपण, स्वत:, कोण, जो, काय.

सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत.

(1) पुरुषवाचक सर्वनाम
(2) दर्शक सर्वनाम
(3) संबंधी सर्वनाम
(4) प्रश्नार्थक सर्वनाम
(5) सामान्य / अनिश्चित सर्वनाम
(6) आत्मवाचक सर्वनाम

 

(1) पुरुषवाचक सर्वनाम

बोलणाऱ्याच्या किंवा लिहणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा, ज्याच्याशी बोलायचे तो आणि ज्याच्याविषयी बोलायचे तो असे तीन भाग पडतात. त्यालाच पुरुष म्हणतात व त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.

पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :
(1) प्रथम पुरुष
(2) द्वितीय पुरुष
(3) तृतीय पुरुष

पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार

(1) प्रथम पुरुष :

मी, आम्ही, आपण, स्वत: इ.
उदा.
मी पेरीसला जाणार.
आपण पेरीसला जावू.

(2) द्वितीय पुरुष :

तो, तुम्ही, आपण, स्वत: इ.
उदा.
तुम्ही कुठून आलात ?
तो का आला ?

(3) तृतीय पुरुष :

तो, ती, त्या, ते, आपण, स्वत: इ.
उदा.
त्याने मला बोलावले आणि स्वत: आला.
ते सर्वजण इकडे होते.

——-

(2) दर्शक सर्वनाम 

दर्शक म्हणजे दाखवणारे. कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
हा, ही, ते, हे, तो, ती,

उदा.
१) हि माझी भानजी आहे.
२) हा तिचा भांजा आहे.

(3) संबंधी सर्वनाम 

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
जो, जे, ज्या, जी.

उदा.
जो महेनत करतो तो पास होतो.

(4) प्रश्नार्थक सर्वनाम 

ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
उदा.
कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला

उदा.
काय हो ही महागाई !

——

(5) सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहे हे सांगता आले नाही की त्याला सामान्य / अनिश्चित सर्वनाम म्हणतात.

उदा.
कोणी कोणास हसू नये.

(6) आत्मवाचक सर्वनाम :

स्वत:विषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात.

उदा.
तो आपण होवून माझ्याकडे आला.

 

READ  लिंग विचार
%d bloggers like this: