आख्यातार्थ

आख्यातार्थ

आख्यातविकार

आख्यातार्थ – लिंग वचन विभक्तीमुळे जसा नामाच्या आणि क्रियापदाच्या रुपात बदल होतो. तसाच काळ आणि आख्यात यांच्यामुळेही क्रियापदाच्या रुपात बदल होतो. त्यालाच आख्यात विकार म्हणतात.

उदा.
(1) काळ/अर्थ – क्रियापद
वर्तमानकाळ – जातो
भूतकाळ – गेला
काळ अर्थ – आख्यात
वर्तमानकाळ – (प्रथम) ‘ता’ ख्यात
भूतकाळ – ‘ला’ ख्यात

(2) काळ/अर्थ – क्रियापद
भविष्यकाळ – जाईल
रीतीभूतकाळ – तो जाई
काळ/अर्थ – आख्यात
भविष्यकाळ – ‘ईला’ ख्यात
रीतीभूतकाळ – ‘ई’ आख्यात

(3) काळ/अर्थ – क्रियापद
आज्ञार्थ – जाऊ
विध्यर्थ – जावा
संकेतार्थ – जाता (तर)
काळ/अर्थ – (द्वितीय) आख्यात
आज्ञार्थ – ‘ऊ’ आख्यात
विध्यर्थ – ‘वा’ ख्यात
संकेतार्थ – (द्वितीय) ‘ता’ ख्यात

आख्यात आणि आख्यातार्थ

आख्यात याचा अर्थ क्रियापद. ज्या क्रियापदापासून काळाव्यतिरिक्त काही वेगळा अर्थ मिळतो त्या क्रियापदाला आख्यात म्हणतात व त्याच्यापासून मिळणाऱ्या अर्थाला आख्यातार्थ म्हणतात.

उदा.
(1) तो अभ्यास करतो.
(2) तू अभ्यास कर.
(3) तू अभ्यास करावे.
(4) जर अभ्यास केलास, तर पास होशील.

आख्यातार्थाचे प्रकार
(1) स्वार्थी क्रियापद :
स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ होय. क्रियेचे विधान तोच त्याचा अर्थ होय. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो व आज्ञा, विधी किंवा संकेत वगैरे अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेवढाच समजतो तेव्हा त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाची सर्व काळांतील रूपे ही ‘स्वार्थी ’ होत.

उदा.
(a) तो मेहेनत करतो.
(b) तो बाहरी गेला.

(2) आज्ञार्थी क्रियापद :
क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे किंवा मागणे, आशीर्वाद देणे, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश करणे या गोष्टीचा बोध होतो. तेव्हा त्यास आज्ञार्थी क्रियापद असे म्हणतात.

उदा.
(a) ईश्वरा, आमच्यावर कृपा कर.
(b) सभेत आपण दोन शब्द बोला.

(3) विध्यर्थी क्रियापद :
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यास विध्यर्थी असे म्हणतात.

उदा.
(a) आपल्याला भेट मिळावा.
(b) सर्वांनी देशसेवेची शपथ घ्यावी.

(4) संकेतार्थी क्रियापद :
जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो. म्हणजे असे केले असते तर असे झाले असते असे समजते, तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात.

उदा.
(a) जर माणसाला पंख असते, तर किती बरे झाले असते.
(b) मला जर बरे वाटत असते तर मी भाग घेतला असता.

READ  प्रयोग मराठी
%d bloggers like this: