उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
दोन शब्द किंवा दोन वाक्यात जोडणार्‍या शब्दांना ‘उभयान्वयी अव्यय’ म्हणतात.

उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पुढील प्रमाणे:

(1) समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय
(2) असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयानव्यी अव्यय

समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक 

जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले दोन वाक्य हे समान दर्जाचे असतात म्हणजे ती वाक्य स्वतंत्र असतात ते एकमेकांवर असलंबून नसतात. अशी वाक्य समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय म्हणून येतात.

यांचे पुढील 4 प्रकार पुढीलप्रमाणे :

(1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
(2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
(3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
(4) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

समुच्चयबोधक 
ही उभयान्वयी दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतात तसेच पहिल्या विधानात/ वाक्यात आणखी भर टाकण्याचे काम करतात.
उदा.
व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय, आणिक इत्यादी.

(a) हॉटेल पाहुणे आले आणि लाईट गेली.
(b) धवल शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला.

विकल्पबोधक 
ही उभयान्वयी अव्यये वाक्यातील दिलेल्या गोष्टीपैकी एकालाच पसंती दर्शवतात.

उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.

(1) तुला चहा हवी की शीत पेय ?
(2) सिनेमाला येतोस की, हॉटेल जातोस ?

न्यूनत्वबोधक 
पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात.

उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.

(a) लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते.
(b) मरावे परी किर्तीरूपी उरावे.

परिणामबोधक 
पहिल्या वाक्यातील एखाद्या गोष्टीचा परिणाम हा समोरील वाक्यात दर्शवण्यासाठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.

उदा.
म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात इत्यादी.

(1) तू गृहपाठ करीत नाहीस म्हणून तुझ्यावर तुझे बाबा रागवतात.
(2) ती नेहमी अभ्यास करते याकरिता ती नेहमी प्रथम येते.
(3) गाडी येताना बंद पडली, सबब मला उशीर झाला.

असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक 

उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य गौण असते तेव्हा अशा अव्ययांना ‘असमानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय’असे म्हणतात.

असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचे 4
प्रकार पुढील प्रमाणे :

(1) स्वरूपबोधक 
(2) उद्देशबोधक 
(3) करणबोधक
(4) संकेतबोधक 

स्वरूपबोधक 
या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसर्‍या वाक्यात कळते.

उदा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी.

(1) एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम.
(2) ती म्हणाला, की तो हरलो.
(3) मी मान्य करतो की, माझ्याकडून चुकी झाली.

उद्देशबोधक 
या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.

उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.

(1) चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो अमरिकाला गेला.
(2) चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप काम करते.
(3) विजितेपद मिळावे यावस्त त्यांनी खूप काम केले.

करणबोधक 
या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे कारण हे दुसर्‍या वाक्यामध्ये कळते.

उदा. कारण, का, की इत्यादी.

(1) त्याला यश मिळाले कारण त्याने खूप चांगले काम घेतली.
(2) मला गृहशास्त्राची माहिती नाही, कारण की, माझ्या अभ्यासक्रमात तो विषय नव्हता.

संकेतबोधक 
या उभयान्वयी अव्ययामुळे एखादी कृती घडण्यामागे विशिष्ट अट सूचित असते. गौण वाक्यात अट (संकेत) दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम झालेला दिसतो.

उदा. जर-तर, जरी-तरी, म्हणजे, की, तर इत्यादी

(1) अरे जर माझे प्रेम तिने स्वीकार केलंच नाही तर हात हातात कसा घेऊ.
(2) एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटरतो म्हणाला
(3) तू घरी आला की, आपण हॉटेलला जाऊ.

 

READ  क्रियाविशेषण अव्यय
%d bloggers like this: