केवल प्रयोगी अव्यय

केवल प्रयोगी अव्यय

 

केवल प्रयोगी अव्यय

आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्‍या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा:
(1) बापरे! पाच वाजले ! (आश्चर्य)
(2) अरेरे ! गोष्ट फार वाईट झाली. (दुःख)

केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार पुढील प्रमाणे :
(1) हर्षदर्शक
(2) शोकदर्शक
(3) आश्चर्यदर्शक
(4) प्रशंसादर्शक
(5) संमतीदर्शक
(6) विरोधदर्शक
(7) तिरस्कारदर्शक
(8) संबोधनदर्शक
(9) मौनदर्शक

हर्षदर्शक
अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो

उदा. अहाहा! किती सुंदर फूल आहे.

शोकदर्शक
आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे

उदा. हाय! खूप वाईट झाले.

आश्चर्यदर्शक
ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या

उदा. अबब! केवढी मोठी सायकूल.

प्रशंसादर्शक
छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी

उदा. शाब्बास! आपण प्रथम आहेत.

संमतीदर्शक
ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा

उदा.
हा! जा मग

विरोधदर्शक
छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च

उदा.
हॅट! असे करू नकोस.

तिरस्कारदर्शक
शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी

उदा.
इश्श! ते मला नको.

संबोधनदर्शक
अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे

उदा.
अगो! एकलत का ?

मौनदर्शक
चुप, चुपचाप, गप, गुपचुप

उदा.
चुपचाप! जास्त बोलू नको

READ  Essay on Shivaji Maharaj in Marathi
%d bloggers like this: