प्रयोग मराठी

प्रयोग मराठी

प्रयोग मराठी वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

मराठी भाषेत प्रयोगाचे तीन प्रकार असतात.
(1) कर्तरी प्रयोग
(2) कर्मणी प्रयोग
(3) भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग

जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .
तो चाय पितो. (कर्ता- पुल्लिंगी)
ती चाय पिते. (कर्ता- लिंग)
ते चाय पितात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :
(1) सकर्मक कर्तरी प्रयोग
(2) अकर्मक कर्तरी प्रयोग

अकर्मक कर्तरी प्रयोग

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
तो चालतो.
ती चालते.
ते चालतात.

सकर्मक कर्तरी प्रयोग

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
पार्थ पाणी भरतो.
आरोही पाणी भरते.
ते पाणी भरतात.

कर्मणी प्रयोग

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :
(1) प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
(2) नवीन कर्मणी प्रयोग
(3) समापण कर्मणी प्रयोग
(4) शक्य कर्मणी प्रयोग
(5) प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग

हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.

उदा.
(a) जो – जो किजो परमार्थ लाहो.
(b) त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने ?

नवीन कर्मणी प्रयोग

ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा.
(1) चोर शिपयांकडून पकडला गेला.
(2) रावण रामाकडून मारला गेला.

समापण कर्मणी प्रयोग

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
१) त्याचे पुस्तक वाचून झाले.
२) रामाची गोष्ट सांगून झाली.

शक्य कर्मणी प्रयोग

जेव्हा कर्मणी प्रयोगातील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
(a) भीमसेनला अजून गाणे म्हणवते.
(b) आई कडून काम करविते.

प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा.
तिने महेनत केला.
त्याने अभ्यास केले.

भावे प्रयोग

जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा.
रमेशने गाईला पकडले.
दिव्याने मुलांना मारले.

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे :
(1) सकर्मक भावे प्रयोग
(2) अकर्मक भावे प्रयोग
(3) अकर्तुक भावे प्रयोग

सकर्मक भावे प्रयोग
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा.
(1) आईने मुलीला मारले.
(2) मांजराने उंदरास पकडले.
(3) शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.

अकर्मक भावे प्रयोग
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा.
तिने जावे.
त्याने खेळावे.

अकर्तुक भावे प्रयोग
भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसतो तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा.
गप्प बसावे.
आता उजाडले.

READ  Marathi Vyakaran For Competitive Exams
%d bloggers like this: