लिंग विचार

लिंग विचार

लिंग विचार नामाच्या रूपावरुन एखादी वस्तु वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की, स्त्रीजातीची आहे की, दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात.

उदा.
तो पुरुष, ती स्त्री, ते मूल.

वरील प्रत्येक शब्दमागे आलेली तो, ती आणि ते ही सर्वनामे त्या त्या शब्दाची वेगवेगळी जात किंवा लक्षण दाखवतात. ह्याच लक्षणांना लिंग असे म्हणतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
(1) पुल्लिंगी
(2) स्त्रीलिंगी
(3) नपुसकलिंगी

लिंगाचे तीन प्रकार
(1) पुल्लिंगी :

मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.

(2) स्त्रीलिंगी :
मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.

(3) नपुंसकलिंगी :
पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल पुढील प्रमाणे :

लिंग बदलले की नामाचे रूप बदलते
(1) मुलगा – मुलगी – मूलगे
(2) पोरगा – पोरगी – पोरगे
(3) कुत्रा – कुत्री – कुत्रे

‘आ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते.

नामाच्या मुळ रुपात होणारा बदल
(1) सुतार – सुतरीन
(2) माळी – माळीन
(3) तेली – तेलीन

काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ‘ईन’ प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात .

शब्दांची स्त्रीलिंग रुपे
(1) हंस – हंसी
(2) वानर – वानरी
(3) बेडूक – बेडकी

काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात.

लिंग परिवर्तन
(1) लोटा – लोटी
(2) खडा – खाडी
(3) दांडा – दांडी

काही ‘आ’ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.
काही वेळेला त्यांचा अर्थ व नामाचा प्रकारही बदलतो.

लिंग परिवर्तनामुळे शब्दाला येणारे वेगळे रूप
(1) पुरुष – स्त्री
(2) दिर – जाऊ

काही शब्दांची स्त्रीलिंगी रुपे मुळ शब्दापेक्षा अगदीच वेगळी असतात.

संस्कृतातुन ‘ई’ प्रयत्य लागुन आलेले काही नाम
(1) युवा – युवती
(2) श्रीमान – श्रीमती
(3) ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती

संस्कृत मधून आलेल्या काही नामांची स्त्रीलिंग रूप ‘ई’ प्रत्यय लागुन होतात.

संस्कृत मधून ‘अ’ कारन्त नामांना ‘ई’ प्रयत्य लागुन आलेले काही नाम
(1) नर्तक – नर्तकी
(2) तरुण – तरुणी

संस्कृत मधून ‘अ’ कारन्त नामांना ‘ई’ प्रयत्य लागुन आलेले काही स्त्रीलिंगी रुपे.

भिन्नलिंगी शब्द
(1) वाडा – वास्तु – घर
(2) देह – काया – शरीर

एकच अर्थ असलेल्या शब्दांचे लिंग वेगवेगळे असतात.

निरनिराळ्या लिंगाचा वापर
(1) तो बाग़ – ती बाग़
(2) तो पोर – ती पोर – ते पोर

काही शब्द काही वेळा निरनिराळ्या लिंगात वापरले जातात.

परभाषेतुन आलेले लिंग
(1) बूट – जोड़ा – पुल्लिंग
(2) पेन्सिल – लेखणी – स्त्रीलिंग
(3) बुक – पुस्तक – नपुंसकलिंग

शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दप्रमाणे असतात.

सामासिक लिंग
(1) गायरान – नपुंसकलिंग
(2) भाजीभाकरी – स्त्रीलिंग

सामासिक शब्दाचे लिंग त्यातील शेवटच्या शब्दावरून ठरते.

READ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 2018 माहिती जीवन चरित्र, इतिहास, विचार, निबंध भाषण मराठी मध्ये
%d bloggers like this: