वचन

वचन

 

वचन एक आहे की अनेक आहेत ती संख्या बोध सूचक गुणधर्मास व्याकरणात ‘वचन’ असे म्हणतात.

मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात.

मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रुपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रुप बदलत नाही.

वचनाचे प्रकार :
(1) एकवचन
(2) अनेकवचन

एकवचन
जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.

उदा.
मासा, गाय, फूल, मुलगा इ.

अनेकवचन
जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात.

उदा.
मासे, गाई, फुले, मुलगे इ.

पुल्लिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
(1) आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.

उदा.
एकवचन – अनेकवचन
रस्ता – रस्ते
आंबा – आंबे
ससा – ससे

(2) आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.

उदा.
एकवचन – अनेकवचन
उंदीर – उंदीर
पाय – पाय
चिकू – चिकू

स्त्रीलिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
(1) अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना कधी आ-कारान्त होते तरे कधी ई-कारान्त होते.

उदा.
एकवचन – अनेकवचन
मांजर – मांजरी
धार – धारा
खाट – खाटा
गंमत – गंमती
चूक – चुका

(2) ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यतः या-कारान्त होते.

उदा.
एकवचन – अनेकवचन
युवती – युवती
मूर्ती – मूर्ती
कळी – कळ्या
आई – आया

(3) ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते.

उदा.
एकवचन – अनेकवचन
वधू – वधू
बाजू – बाजू
जाऊ – जावा
जळू – जळवा

(4) सामान्यतः आ-कारान्त स्त्रीलिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात.

उदा.
एकवचन – अनेकवचन
पूजा – पूजा
कन्या – कन्या
शिक्षिका – शिक्षिका

नपुसकलिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
(1) अ-कारान्त/ऊकारान्त नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन ए-कारान्त होते.

उदा.
एकवचन – अनेकवचन
वासरू – वासरे
मत – मते
फूल – फुले
पाखरू – पाखरे
बदक – बदके

(2) ए-कारान्त नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन ई-कारान्त होते.

उदा.
एकवचन – अनेकवचन
सोने – सोने
रुपे – रुपे
गाणे – गाणी
खेडे – खेडी

READ  Essay On Yoga In English
%d bloggers like this: