विभक्ती

विभक्ति

विभक्ती वाक्यातील शब्दांचा वाक्यातील मुख्य शब्दाशी म्हणजेच क्रियापदाशी संबंध असतो, त्याला कारक म्हणतात.

शब्दातील नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

शब्दांना जी अक्षरे जोडली जातात किंवा शब्दांना बदल ज्या अक्षरांनी दाखवला जातो त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
उदा. ल्या, ल, ला, ली

नामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध आठ प्रकारचा असतो म्हणून मराठी भाषेत एकूण आठ विभक्त्या असतात.
त्या पुढीलप्रमाणे

प्रथमा
एकवचन :- मुल
अनेकवचन :- मुले

द्वितीया
प्रत्यय :- स, ला,
एकवचन :- मुलास, मुलाला
प्रत्यय :- स, ना
अनेकवचन :- मुलांस, मुलांना,

तृतीया
प्रत्यय :- ने, शी
एकवचन :- मुलाने, मुलाशी
प्रत्यय :- नी, शी
अनेकवचन :- मुलांनी, मुलांशी

चतुर्थी
प्रत्यय :- स, ला,
एकवचन :- मुलास, मुलाला
प्रत्यय :- स, ना
अनेकवचन :- मुलांस, मुलांना,

पंचमी
प्रत्यय :- ऊन, हून
एकवचन :- मुलाहून
प्रत्यय :- ऊन, हून
अनेकवचन :- मुलांहून

षष्ठी
प्रत्यय :- चा, ची, च्या
एकवचन :- मुलाचा, मुलाची, मुलाच्या
प्रत्यय :- चा, ची, चे, च्या
अनेकवचन :- मुलांचा, मुलांची, मुलांचे, मुलांच्या

सप्तमी
प्रत्यय :- त
एकवचन :- मुलात
प्रत्यय :- त, आ
अनेकवचन :- मुलांत, मुलां

अपादान
क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात.

उदा. हितेश घरातून बाहेर आला.
घरातून या शब्दाची विभक्ती पंचमी आहे. म्हणून पंचमीचा प्रमुख कारकार्थ अपादान असतो.

संबोधन
एकवचन :- मुला
अनेकवचन :- मुलांनो

कारकार्थ किंवा कारकविभक्ती
नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो, त्या संबंधाला कारकार्थ किंवा कारकविभक्ती म्हणतात.

विभक्तीचे कारकार्थचे प्रकार पुढीलप्रमाणे :

कर्ता
क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. कर्त्यांची प्रथमा विभक्ती असते. म्हणून प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता असतो.

उदा. हितेश ज्यूस पितो.

कर्म
कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडलेली किंवा घडते हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय. कर्माची द्वितीया असते, म्हणून द्वितीयेचा प्रमुख कारकार्थ कर्म असतो.

उदा. हितेश काम करतो.

करण
वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात. तृतीयेचा प्रमुख कारकार्थ करण असतो.

उदा. हितेश चाकूने कांदा कापतो.

संप्रदान
जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात.

उदा. हितेश सुरेशला पुस्तक देतो.
सुरेशला ही चतुर्थी विभक्ती आहे. म्हणून चतुर्थीचा प्रमुख कारकार्थ संप्रदान असतो.

अधिकरण
वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात.

उदा. रोज दुपारी हितेश दुकानात जातो.
दुपारी आणि दुकानात हे शब्द अनुक्रमे क्रियेचा काळ व दुकानात हे शब्द क्रियेचे स्थळ दर्शवित असून त्यांची विभक्ती सप्तमी ही आहे व त्या सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकारण हे आहे.

READ  Bank Loan Options In India
%d bloggers like this: