पदपरिस्फोट/व्याकरण चालवणे

पदपरिस्फोट/व्याकरण चालवणे

पदपरिस्फोट / व्याकरण चालवणे
शब्दांचे व्याकरण चालविणे’ म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय.

आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम,किंवा सर्वनाम त्यांना होणा-या लिंग, वचन, विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ, अर्थ, प्रयोग, यांची संपूर्ण माहिती मिळविली.

या माहितीच्या ‘शब्दाचे व्याकरण चालविणे’ यासाठी उपयोग होतो. यालाच ‘पदपरिस्फोट’ असेही कोणी म्हणतात.

नामाचे व्याकरण चालवणे
नाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.

उदा.
त्यांनी भिंतला रंग दिला.
घराला :- मूळ शब्द – भिंत, प्रकार – नाम, पोटप्रकार – सामान्यनाम, लिंग – नपुंसकलिंग, वचन – एकवचन, विभक्ती – चतुर्थी, विभक्तीचा अर्थ – संप्रदान, वाक्यातील स्थान – दिला या क्रियापदाचे अप्रत्यक्ष कर्म.

सर्वनामाचे व्याकरण चालवणे
सर्वनाम :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, लिंग, वचन, विभक्ती, विभक्तीचा अर्थ, वाक्यातील स्थान.

उदा.
मी स्वत: एक कविता केली आहे.
स्वत: :- मूळ शब्द – स्वत:, प्रकार – सर्वनाम, पोटप्रकार – आत्मवाचक सर्वनाम, लिंग – उभयलिंगी, वचन – एकवच, विभक्ती – प्रथमा, विभक्तीचा अर्थ – कर्ता, वाक्यातील स्थान – कर्ता.

विशेषणाचे व्याकरण चालवणे
विशेषण :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, कोणत्या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) माहिती देते ते विशेष्य.

उदा.
बागेत चार माळी काम करत होते.
चार :- मूळ शब्द – चार, प्रकार – विशेषण, पोटप्रकार – संख्याविशेषण. माळी या विशेष्याबद्दल (नामाबद्दल) विशेष माहिती देते.

क्रियापदाचे व्याकरण चालवणे
क्रियापद :- मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार, रूप, अर्थ, काळ, लिंग, वचन, पुरुष, वाक्याचा प्रयोग.

उदा.
संतोष अभ्यास करत होता.
करत होता :- मूळ धातू – कर, क्रियापदाचा प्रकार – संयुक्त क्रियापद, रूप – करुणरूप, अर्थ – स्वार्थ, काळ – अपूर्ण भूतकाळ, लिंग – पुल्लिंग, वचन – एकवचन, पुरुष – तृतीय पुरुष, प्रयोग – कर्तरी.

पदपरिस्फोट/व्याकरण चालवणे
अव्ययांचे व्याकरण चालवणे
अव्यय :- मूळ शब्द, प्रकार, पोटप्रकार, असल्यास काही विशेष माहिती.

उदा.
मी व माझा भाऊ रोज देवाला नमस्कार करतो.
व :- मूळ शब्द – व, प्रकार – उभयान्वयी अव्यय, पोटप्रकार – समुच्चयबोधक, ‘मी’ , ‘भाऊ’ या दोन शब्दांना जोडणारे.

READ  अलंकार
%d bloggers like this: