मराठी म्हणी

मराठी म्हणी

 

मराठी म्हणी म्हणजे विशिष्ट पद्धतीचे बोलणे. म्हणीच्या बाबतीत, एका पूर्ण विधानात बोलणाऱ्याच्या मनातील एक अनुभव व्यक्त झालेला असतो.

         उदा.

  1. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच.
  2. घरोघर मातीच्या चुली – सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते.
  3. काखेत कळसा गावाला वळसा.
    अर्थ :- एका बाईचा विसरभोळेपणा दाखवला आहे. तिच्या कमरेवर कळशी असते; पण तिला त्याचा पत्ता नसतो. ती गावभर कळशी शोधत फिरत असते. जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेत राहणे हा अर्थ यातून व्यक्त होतो.
  4. ऐकावे जनाचे, करावे मनाचे – सर्वांचा विचार घ्यावा व आपणांस योग्य वाटेल ते करावे.
  5. करावे तसे भरावे – जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे.
  6. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरुन करता येतो.
  7. हजीर तो वजीर – जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो.

मराठी म्हणी pdf

%d bloggers like this: