मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार

मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार

मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे प्रकार

नाम वाक्य

दिलेल्या मिश्र वाक्यातील एका वाक्याला ‘काय’ ने प्रश्न विचारल्यास उत्तर येणारे वाक्य गौण वाक्य असते व प्रश्न विचारलेले वाक्य प्रधान वाक्य असते. असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते व कर्म नेहमी नाम असते म्हणून अशा गौण वाक्यास नाम वाक्य म्हणतात.

उदा.
१) आई म्हणाले की, आज गेलेच पाहिजे.
२) रवीचा विश्वास आहे, की मला बक्षीस भेटेल.

विशेषण वाक्य

मुख्य वाक्यातील एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या गौण वाक्याला विशेषण वाक्य म्हणतात. अशी वाक्य बहुधा जो-तो, जे-ते, जी-ती ने जोडलेली असतात. यातील पहिले वाक्य बहुधा विशेषण गौण वाक्य असते.

उदा.
(a) जे शिल्प भंगले आहे ते फार प्राचीन आहे.
या वाक्यात जे चकाकते हे गौण वाक्य मुख्य वाक्यातील सोने या नामाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून ते विशेषण वाक्य आहे.
(b) जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला.

क्रियाविशेषण वाक्य

गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण यांच्या बाबतीत स्थळ, काळ, रीत, संकेत, कारण, उद्देश याविषयी माहिती सांगत असेल तर ते क्रियाविशेषण गौण वाक्य होय.

उदा.
जेथे जावे तेथे गर्दीच असते.
तो वाचला, कारण त्याने उडी मारली.

 

READ  अलंकार
%d bloggers like this: