वाक्यपृथक्करण

वाक्यपृथक्करण

वाक्यपृथक्करण
पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे. वाक्यातील भाग वेगळे करून दाखवणे याला वाक्य पृथक्करण म्हणतात.

वाक्याचे २ भाग आहेत.

(1) उद्देश विभाग :

(a) उद्देश (कर्ता) :
वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.

उदा.
(a) श्यामरावांची गाय मेली.
(b) कल्पेशचा रुमाल फाटला.

(2) उद्देश विस्तार :

कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील. तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात म्हणतात.

उदा.
(a) नियमित मेहेनत करणारे विद्यार्थी पास होतात.
(b) शेजारचा श्यामू धपकन पडला.

विधेय विभाग/ विधेयांग

वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.

उदा.
रमेशने झाडाचे आंबे काढले.

कर्म विस्तार
कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म विस्तार’ होय.

उदा.
गवळ्याने गाईची धार काढली.

विधान पूरक
कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर त्यास ‘विधानपूरक’ म्हणतात.

उदा.
१) रोनक डॉक्टर झाला.
२) रोनक पोलिस आहे.

विधेय विस्तार
क्रियापदास विधेय असे म्हणतात. वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास ‘विधेय विस्तार’ उत्तर येते.

उदा.
शाळेतील सर्व मुले बुधवारी सहलीला गेले.

विधेय/क्रियापद
वाक्यातील क्रियापदाला ‘विधेय’ असे म्हणतात.

उदा.
(a) हितेश पोहतो.
(b) हितेश टीव्ही बघतो.

READ  शब्दयोगी अव्यय
%d bloggers like this: