वाक्यरुपांतर (वाक्यपरिवर्तन)

वाक्यरुपांतर (वाक्यपरिवर्तन)

वाक्यरुपांतर (वाक्यपरिवर्तन)
वाक्यार्थाला बाध न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरुपांतर होय.

वाक्यरूपांतराचे काही प्रकार :

(1) प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर :

नेहमीच्या व्यवहारात आपण अनेक प्र्श्न विचारतो : तू कोठे चाललास ? तुला किती गुण मिळाले प्रकृती आता कशी आहे ? वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपणांला त्यांची काही उत्तरे हवी असतात म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात.

उदा.
जगी सर्वदुखी असा कोण आहे ? (प्रश्नार्थी)
जगात सर्वदुखी असा कोण नाही? (विधानार्थी)

वरील वाक्यात होकारार्थी प्रश्न विचारला आहे; मात्र त्याने सूचित केलेले उत्तर नकारार्थी आहे. ‘जगी सर्वदुखी असा कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर ‘मी आहे’ असे द्यायचे नसते. हा प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यात आला नसून त्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते. ‘जगात कोणीच दुखी नाही’ असे लेखकाला स्पष्ट म्हणायचे आहे पण प्रश्न विचारल्यामुळे मूळचे साधे विधान किती जोरदार झाले आहे पाहा!

उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर

(a) काय उकडले हो काल रात्री (काल रात्री मनस्वी उकडले.)
(b) काय अक्षर आहे त्याचे ! (त्याचे अक्षर अतिशय सुदंर आहे.)

वरील वाक्यांतील विधाने उद्गारार्थी आहेत. तीच कंसात विधानार्थी दिलेली आहेत. कंसातील विधानार्थी ठेवलेली आहेत. कंसातील विधानार्थी वाक्ये उद्गारार्थी ठेवल्यामुळे कशी परिणामकारक वाटतात.

पाहा. ‘अरेरे !फार वाईट गोष्ट झाली !’ अशासारख्या उद्गारार्थी वाक्यात केवळ भावना व्यक्त केलेल्या असतात पण वर दिलेल्या वाक्यांत भावनेपेक्षा वैपुल्य, अतिशयता, मोठी संख्या, परिमाण किंवा आधिक्य परिणामकारक रीतीने व्यक्त झालेले असते.

केव्हा – केव्हा मनातील तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद्गारार्थी वाक्य वापरलेले असते.

होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर

लाख रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (होकारार्थी)
लाख रुपये ही काही लहान रक्कम नव्हे. (नकारार्थी)

दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे पण दुसरे वाक्य अधिक परिणामकारक वाटते. हे करताना आपण पहिल्या वाक्यातील ‘मोठी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ‘लहान’ हा वापरला व वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून ‘नव्हे’ हा नकारार्थी बदल शब्द घातला.

विरुध्दार्थी शब्द बनविण्याचे प्रकार दोन आहेत.

(a) शब्दाच्या मागे ‘अ, अन्, न, ना, बे, गैर, विना’ यांसारखे उपसर्ग जोडून :
उदा.
जबाबदार – बेजबाबदार
तक्रार – बिनतक्रार
मंगल – अमंगल
कळत –नकळत

(b) विरुध्द अर्थाचा दुसरा शब्द वापरुन :
उदा.
सुरुवात – शेवट
स्वीकारणे – नाकारणे
श्रीमंत – दरिद्री
नफा – तोटा

कर्तरी व कर्मणी प्रयोगांचे परस्पर रुपांतर

मराठीत मुख्य प्रयोग तीन आहेत.
(a) कर्तरी,
(b) कर्मणी व
(c) भावे. या प्रयोगाचे परस्पर रुपांतर करता येईल.

उदा. राजू नोकरी करतो

या कर्तरीप्रयोगातील वाक्याचे रुपांतर कर्मणीप्रयोगात करावयाचे तर ‘राजूने नोकरी केली’ असे होईल. म्हणजे काळात बदल हा करावाच लागतो. त्यामुळे तोच मूळ अर्थ कायम राहात नाही. मात्र ज्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो तो करताना काळ बदलावा लागत नसला तरी मराठीला अपरिचित अशी वाक्यरचना करावी लागते.

उदा.
तो लेख वाचतो. (कर्तरी)
त्याचे लेख वाचून झाले. (कर्मणी)
त्याने लेख वाचावे. (भावे)

मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रुपांतर

वाक्याचा अर्थ न बदलता त्याचे परस्पर रुपांतर करता येणे शक्य आहे.

(a) जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा मी वर्गात जाऊन पोहचलो होतो.
जेव्हा मी वर्गात जाऊन पोहचलो तेव्हा शाळेची घंटा अद्याप व्हायची होती.
( पहिल्या वाक्यातील गौणवाक्य दुस-या वाक्यात मुख्य वाक्य व्हायची होती.)

(b) जे जे चकाकते ते ते सोने नव्हे .
जे जे सोने नसते ते देखील केव्हा केव्हा चमकते.

केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रुपांतर

वाक्यसंश्लेषण किंवा वाक्यसंकलन हा वाक्यरूपांतरणाचा एक भाग होय.

उदा. :
माझ्या पोटात दुखत आहे. मी शाळेत येणार नाही.
केवल वाक्य :- माझ्या पोटात दुखत असल्यामुळे मी शाळेत येणार नाही.
संयुक्त वाक्य :- माझ्या पोटात दुखते म्हणून मी शाळेत येणार नाही.
मिश्र वाक्य :- मी शाळेत येणार नाही कारण माझ्या पोटात दुखते.

शब्दांचा प्रकार बदलून वाक्यरचना योजणे

शब्दांच्या जाती आठ म्हणजे त्यांची कार्ये आठ. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यांत निरनिराळी कार्ये करताना आढळतो. म्हणजे त्या – त्यावेळी त्या शब्दाची जात बदलते पण अर्थामध्ये बदल होत असतो. शब्दाच्या बदल न करता शब्दाची जात बदलता येणे शक्य आहे.

उदा.
(a) मी कागद टरकावून फेकून दिला. (क्रियाविशेषण)
मी कागद टरकावला व फेकून दिला. (क्रियापद)

(b) हा मुलगा हुशार आहे. (विशेषण)
हा हुशार मुलगा आहे. (सर्वनाम)

(c) श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण)
श्रीमंतांना गर्व असतो. (नाम)

(d) त्याच्या डोळ्यांत पाणी आले. (नाम)
त्याचे डोळे पाणावले. (क्रियापद)

READ  Global warming
%d bloggers like this: