शब्दसिद्धी

शब्दसिद्धी

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच ‘शब्दसिद्धी’ असे म्हणतात.

शब्दांचे २ प्रकार आहेत.

(1) सिद्ध शब्द
(2) साधित शब्द

अभ्यस्त शब्दांचे प्रकार

एखाद्या शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना ‘अभ्यस्त शब्द’ असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.

उदा.
शेजरीपाजारी, किरकिर इ.

अभ्यस्त शब्दांचे 3 प्रकार पडतात.

i) पूर्णाभ्यस्त शब्द :

एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा.
बडबड, बारीक बारीक, समोरासमोर, जो जो, क्षणक्षण, आतल्या आत, कळकळ, मळमळ, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

ii) अंशाभ्यस्त शब्द :

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा.
लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, अदलाबदल, उभाआडवा, गोडधोड, गडबड, दगडबिगड, घरबीर इ.

iii) अनुकरणवाचक शब्द :

ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात.

उदा.
खडखडाट, रिमझिम, गुणगुण, गुटगुटीत, गडगडाट, किरकिर, कडकडाट इ.

शब्दांचे प्रकार
जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्‍या शब्दाला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात.

उदा.
देवघर, पोळपाट इ.

शब्दसिद्धी
शब्दांचे प्रकार
शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.

उदा.
ये, जा, पी, उठ, कर, गा इ.

सिद्ध शब्दांचे ४ प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :

(a) तत्सम
(b) तद्भव
(c) देशी
(d) परभाषीय

सिद्ध शब्दांचे प्रकार

(a) तत्सम :

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात.

उदा.
पुष्प, परंतु, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद

(b) तद्भव :

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ‘तदभव शब्द’ असे म्हणतात.

उदा.
सासू, सासरा, गाव, दूध, घास, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, शेत, पाणी,

(c) देशी :

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्‍या शब्दांना ‘देशी शब्द’ असे म्हणतात.

उदा.
घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, डोळा, मुलगा, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार,

(d) परभाषीय :

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ‘परभाषीय शब्द’ असे म्हणतात.

उदा.
हिन्दी शब्द – बच्चा, बात, भाई, दिल, बेटा, तपास, और, नानी, मंजूर, इमली इत्यादी
गुजराती शब्द – दलाल, डबा, दादर, रिकामटेकडा, शेट इत्यादी
इंग्रजी शब्द – टी.व्ही., स्टेशन, डॉक्टर, कोर्ट, तिकीट, पेन, पार्सल, सायकल, हॉस्पिटल, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, ग्लास, इत्यादी

अरबी शब्द – अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी
कानडी शब्द – तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी

तेलगू शब्द – शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी
फारसी शब्द – समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, कामगार, गुन्हेगार, बाम, लेजीम, शाई, गरीब, मोहोर, सरकार इत्यादी

साधित शब्दांचे प्रकार

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून ‘साधित शब्द’ तयार होतो.

साधित शब्दांचे पुढील प्रकार पडतात.

(a) उपसर्गघटित :

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना ‘उपसर्ग घटित शब्द’ असे म्हणतात.

उदा.
उपहार, अपयश, संभाषण, आकार, प्रगती, अनुभव, साकार, प्रतिकार, प्रकार इ.

(b) प्रत्ययघटित शब्द :

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्‍या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात.

उदा.
जनन, जनक, जननी, जनता, झोपाळू, ओढा

READ  पदपरिस्फोट/व्याकरण चालवणे
%d bloggers like this: