शुद्धलेखनाचे नियम

शुद्धलेखनाचे नियम

 

शुद्धलेखनाचे नियम
अनुस्वार
शुद्ध कसे बोलावे व लिहावे हे आपल्याला व्याकरण शिकवते. व्याकरणात त्याविषयी काही नियम असतात.

व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन होय.

शुद्धलेखनाचे काही नियम :
(1) अनुस्वार :-

(1) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो; त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
उदा.
तंतू, घंटा, करंजी, गुलकंद, तंटा, चिंच, उंट, आंबा, हिंग, सुंठ, गंमत, गंगा, कुंकू, कंकण

(2) नाम व सर्वनाम यांच्या अनेकवचनी सामान्यरूपांतील शेवटच्या अक्षरावर, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा.
मुलांसाठी, झाडांचा, पक्ष्यांचा, त्यांचा, कागदांवर

(3) एखादे नाम आदरार्थी अनेक वचनात वापरताना त्याच्या सामान्यरूपाच्या अखेरच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
उदा.
वडिलांना, शिक्षकांना

ऱ्हस्व – दीर्घ
(a) मराठीतील इकारान्त व उकारान्त तत्सम (संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले) शब्द दीर्घ स्वरान्त लिहावेत.
उदा.
गुरु, अणू, आकृती

(b) इतर शब्दांच्या शेवटी येणारे इकार, उकार, दीर्घ लिहावेत.
उदा.
खाऊ, गडू, घुंगरू, कचेरी

(c) सामासिक शब्दातील पहिले पद इकारान्त किंवा उकारान्त तत्सम शब्द असेल, तर ते ऱ्हस्व लिहावे.
उदा.
वायुपुत्र, गुरुदक्षिणा, कविसंमेलन

(d) अकारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा.
पूल, ऊस, जमीन

(e) उपान्त्य इकार व उकार असलेल्या शब्दांचे सामान्यरूप करताना इकार व उकार ऱ्हस्व लिहावेत.
उदा.
पूल – पुलाखालून, गूळ – गुळासाठी, ऊस – उसाचा

तत्सम शब्द या नियमाला अपवाद आहेत.
उदा.
तीर्थ – तीर्थामध्ये, तीर – तीरावरून

इतर काही नियम
(a) तीनअक्षरी शब्दातील मधले अक्षर ‘ई’ किंवा ‘ऊ’ असेल, तर सामान्यरूप करताना ‘ई’ च्या जागी ‘य’ व ‘ऊ’ च्या ‘व’ करायचा.
उदा.
फाईल – फायलीत, देऊळ – देवळात

(b) ‘पूर’ हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही गावाच्या नावाला लावताना त्यातील ‘पू’ दीर्घ लिहावा.
उदा.
नागपूर, कानपूर, बेलापूर

READ  India Independence Day 2018 HD wallpapers
%d bloggers like this: