ख्रिसमस / नाताळ

ख्रिसमस किवा नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा महत्वपूर्ण सण आहे. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मा जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना.

ख्रिस्ती बायबलच्या लूक व मॅथ्यु हे दोन्ही सेंट, येशू ख्रिस्तांच्या जन्माचे संदेश देतात. बायबलनुसार येशू ख्रिस्तांचा जन्म जुदेआच्या बेथलेहॅम या जागी एका गोठ्यात झाला. संत लुकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहॅमच्या यात्रेचा वृत्तांत दिलेला आहे. असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजू-बाजूचे सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यु यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय ईजिप्तला गेले.
रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.

या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जावून येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. यांना केरॉल असे म्हणतात.

या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभ कामना कार्डसची घेवाण देवाण होते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात करतात.
संपूर्ण जगभरातल्या गिरीजाघरां मध्ये येशुची जन्मगाथा झाक्यांच्या रूपात प्रदर्शित केल्या जाते. चोवीस डिसेंबरच्या रात्री पासूनच आरती व पुजा पाठास सुरूवात होते. दूसरया दिवशी सकाळीच जन्म दिनाचा सोहळा असतो.

ख्रिश्चन बांधव एक दूसरयांची गळाभेट घेवून शुभेच्छांचे आदान प्रदान करतात. गिरिजाघरात मंगल कामनेचे प्रतिक म्हणून ख्रिसमच-ट्रीची सजावट केली जाते. आज ‍नाताळला धार्मिकते सोबतच सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे.
इंग्रजी भाषीक देशामधील लोकं या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक इत्यादी बनवतात. भारताच्या नागरी भागात हा सण पश्चिमी देशां सारखच साजरा करतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना मिठाई व भेट वस्तू देतो.

परंतू देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्‍यांच्या लोकांच खानपान या दिवशी वेगळ असते. तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी हे यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असतते.
आर्थिकरित्या संपन्न नसणारया घरात हे व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते. दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येतो.

परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असते, म्हणून रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *