गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) सहाय्यित “महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे”

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : गरिबी निर्मुलनासाठी जपानचा निधी (JFPR) सहाय्यित “महाराष्ट्रातील लहान शेतक-यांना बाजारपेठेशी जोडणे”
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र. बासप्र 2008/प्र.क्र 46/21 स, दि.29/10/2010
योजनेचा प्रकार : ऐच्छिक
योजनेचा उद्देश : राज्यातील लहान फळे व भाजीपाला उत्पादक शेतक-यांना शेतमाल विक्रीचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध करुन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी
योजनेच्या प्रमुख अटी : महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये एकुण चौदा ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ही चौदा ठिकाणे नाशिक व औरंगाबाद-अमरावती या दोन मुल्यसाखळ्यांमध्ये विभागलेली आहेत. या दोन मुल्य साखळ्यांतील एकूण 14 ठिकाणी फळे व भाजीपाला उत्पादकांच्या एकूण 18 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या असून फक्त सदर 18 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
आवश्यक कागदपत्रे : आशियाई विकास बॅंकेच्या मान्यतेने वेळोवेळी निश्चित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचीनुसार
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • • काढणी पश्चात हाताळणी, मुल्यवृध्दी, विक्री व्यवस्थापन इ. बाबींचे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना प्रशिक्षण.
  • • शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी प्रक्षेत्र भेटी.
  • • शेतकरी-खरेदीदार थेट संबंध स्थापित करण्यासाठी विशेष परिसंवाद.
  • • शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी “फिरता निधी” (Revolving Fund).
  • • शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उभारण्यात येणा-या प्राथमिक प्रक्रीया सुविधांसाठी (Primary Processing Infrastructure) अर्थसहाय्य.
अर्ज करण्याची पद्धत : टपालाद्वारे अथवा ईमेलद्वारे (फक्त संबंधित १८ शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी)
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
  • प्रकल्प संचालक,
  • निधी व्यवस्थापन कक्ष,
  • जेएफपीआर प्रकल्प,F/E/78, LDB बिल्डींग, गुलटेकडी, मार्केटयार्ड, पुणे-37.
  • दुरध्वनी क्र.-020-2426 0574/5. ई-मेल – giujfpr@msamb.com.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: लागू नाही

About takmukteshwar

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *