नाविन्यपूर्ण योजना- 1000 मांसल पक्षी संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : नाविन्यपूर्ण योजना- 1000 मांसल पक्षी संगोपनातून कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे
योजने बद्दलचा शासन निर्णय : शासन निर्णय क्र.राज्ययो-2012/प्र.क्र.162/पदुम-4 दि.14/2/2013.
योजनेचा प्रकार : वैयक्तिक लाभाची योजना
योजनेचा उद्देश : ग्रामीण भागात, रोजगार निर्मिती व कुक्कूटपालन व्यवसायास प्रोत्साहन देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्वसाधारण / अनूसूचित जाती /अनूसूचित जमाती
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1 अर्जदाराकडे 3 (तीन) गुंठे स्वत:च्या मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा आवश्यक, अनूसूचित जाती/अनूसूचित जमातीच्या अर्जदाराकडे किमान 1.5 (दीड) गुंठे स्वत:च्या मालकीची अथवा भाडेपट्टीची जागा आवश्यक आहे.
 • 2 या योजनेमधे देण्यात आलेल्या अर्थसहाय्यातून उभारलेले कुक्कूटगृह हे कुक्कूट पालनासाठीच वापरणे बंधनकारक आहे.
 • 3 पक्षीगृहाचे बांधकाम हे शासनाने निश्चित केलेल्या आराखडयाप्रमाणे असावे.
 • 4 अर्जदाराचे पती/पत्नीपैकी कोणीही शासकीय/निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्त नाही , अथवा पदाधिकारी नसावेत.
 • 5 लाभार्थीने सदर व्यवसाय 3 ते 5 वर्ष/ बँकेच्या कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत करणे बंधनकारक आहे.
 • 6 एकुण निवड करावयाच्या लाभधारकांमध्ये 3 टक्के विकलांग व 30 टक्के महिला लाभार्थीचा समावेश राहील.
 • 7 योजनेअंतर्गत उभारलेल्या पक्षीगृहाचे पाठपुराव्यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना पाठपुरावा/ योजना मूल्यांकनासाठी आवश्यक त्या वेळेस माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
 • 8 पक्षीगृहातील पक्षी मृत पावल्यास नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यास सुचित करून मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करून घेणे व शास्त्रोक्त पध्दतीने त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.
 • 9 योजनेअंतर्गत – प्राप्त पक्षीगृहातील पक्षांना साथीच्या रोगांपासून संरक्षण मिळण्यासाठी वेळोवेळी लसीकरण करून घेण्याची जबाबदारी लाभधारकांची राहील.
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
 • 2. 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. 8
 • 3. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
 • 4 जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
 • 5. रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डाचीप्रत.
 • 6. अपत्य दाखला (ग्रामपंचायत यांचा)
 • 7. रहिवासी प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • प्रकल्पाची एकुण किमंत रु. 225000/- असुन
 • 1.सर्वसाधारण प्रवर्ग – 50 टक्के अनुदान
 • 2.अनूसूचित जाती /अनूसूचित जमाती – 75% अनुदान
अर्ज करण्याची पद्धत : नजिकचा पशुवैद्यकिय दवाखाना व पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीकडे अर्ज करावा लागेल.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 90 दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • 1.पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती
 • 2.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद,
 • 3.जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सुविधा उपलब्ध नाहीत.

About takmukteshwar

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *