महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-2015

अ. क्र. Scheme सविस्तर माहिती
योजनेचे नाव : महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-2015
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1. उ.ऊ.व का.वि. शासन निर्णय क्र. आयटीपी-2013/(प्र. क्र. 265)/उद्योग-2, दिनांक 25 ऑगस्ट, 2015.
 • 2. उ.ऊ.व का.वि. शासन निर्णय क्र. मातंधो-2015/प्र.क्र.207/उद्योग-2, दिनांक 22 फेब्रुवारी, 2016.
योजनेचा प्रकार : योजनेतर
योजनेचा उद्देश :
 • अ) महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा क्षेत्रातील अग्रस्थान कायम राखणे.
 • ब) राज्यातील औद्योगिकदृष्टया कमी विकसित भागात आणखी गुंतवणूकीचा ओघ वाढविण्यासाठी चालना देणे.
 • क) राज्याच्या सर्व भागातील, समाजाच्या सर्व स्तरातील शिक्षित तरुणांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे.
 • ड) निर्यात उलाढालीतील उच्च पातळी गाठून त्याव्दारे राज्याच्या स्थुल घरगुती उत्पादनात आणि उत्पादकतेत वाढ घडवून आणणे.
 • इ) राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता एक साधन म्हणून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वापर करणे.
 • फ) मूळ सामुग्री निर्मितीसह नवीन उत्पादन व बिझनेस टु बिझनेस आणि बिझनेस टु कस्टमर यांना पुरविल्या जाणाऱ्या अव्दितीय सेवांकरिता बौध्दीक मत्ता निर्मितीस प्रोत्साहन देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :
योजनेच्या प्रमुख अटी :
 • खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी विविध परिमाणांकरीता – निकष आणि अटी व शर्ती
 • 1) अर्जदाराची अर्हता :-
 • 1.1 खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यान स्थापन करणाऱ्या संस्थेची घटना नोंदणीकृत मालकी/ भागीदारी संस्था / खाजगी मर्यादितकंपनी/सार्वजनिक कंपनी/ सार्वजनिक मर्यादित कंपनी/सहकारी संस्था अथवा ट्रस्ट यापैकी असावी.
 • 1.2 माहिती तंत्रज्ञान उद्यानाकरीता विहित केलेल्या निकष आणि अटी व शर्तीची पूर्तता करण्यासाठी उद्यानाच्या व्यवस्थापनाबाबत कायदेशीर जबाबदार संस्था, उद्यानाचे प्रवर्तक किंवा विकासक अर्ज करण्यास पात्र आहेत.
 • 2. खाजगी क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उद्यानांच्या विविध परिमाणांचे-निकष
 • अ.क्र. पायाभूत सोयी सुविधांचे परीमाण निकष
  १. बांधकाम क्षेत्रफळ माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी ‍ किमान 20,000 चौ. फूट एवढे बांधकाम क्षेत्रफळ आवश्यक आहे. सदरचा बांधकाम क्षेत्रफळे अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (Additional FSI) /विकास हक्काचे हस्तांतरासह (TDR) मूळ चटईक्षेत्र निर्देशकांच्या माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक राहील.
  2 बांधकाम क्षेत्राचे विनियोजन/ वापर पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवीमुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महानगरपालिका आणि अंबरनाथ नगरपरिषद या ठिकाणच्या सार्वजनिक तसेच खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने/ एव्हीजीसी उद्याने यांना एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या किमान 80% क्षेत्र माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी व उर्वरित कमाल 20% पर्यंत बांधकाम क्षेत्रफळ (पार्किंग क्षेत्र वगळून) पुरक सुविधांसाठी अनुज्ञेय राहीलवर नमूद केलेल्या महानगर पालिका व नगर परिषद वगळता राज्यातील इतर सर्व ठिकाणच्या सार्वजनिक तसेच खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्याने/ एव्हीजीसी उद्याने यांना एकूण बांधकाम क्षेत्रफळाच्या किमान 60% क्षेत्र माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांसाठी व उर्वरित कमाल 40% पर्यंत बांधकाम क्षेत्रफळ (पार्किंग क्षेत्र वगळून) पुरक सुविधांसाठी अनुज्ञेय राहील
  3 विद्युत पुरवठा व्यवस्था व क्षमता खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या 6 वॅट प्रति चौ. फूट या दराने निश्चित करण्यात आलेल्या वीज पुरवठा क्षमतेचे स्वतंत्र सबस्टेशन उद्यानांच्या आवारात उभारुन सदर वीज सबस्टेशनला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या नजीकच्या स्त्रोत्रातून समर्पित विद्युत पुरवठा वाहिनीच्या माध्यमातून उद्यानाच्या प्रवर्तकास वीज पुरवठा प्राप्त करणे आवश्यक आहे.
  4 राखीव विद्युत पुरवठा व्यवस्था(Standby Electricity) वरील मुद्दा क्र. 3 प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या एकूण विद्युत पुरवठा क्षमतेच्या किमान 30टक्के एवढी राखीव विद्युत निर्मितीची व्यवस्था प्रवर्तकास करणे बंधनकारक आहे.
  5 जोडणी क्षमता (Connectivity)
 • 5. माहिती तंत्रज्ञान उद्यानात सॅटलाईट अर्थ स्टेशन उपलब्ध असल्यास जोडणीच्या क्षमतेची मर्यादा लागू राहणार नाही अन्यथा किमान 2.0 Mbps क्षमतेची ओएफसी जोडणी पुरविणे आवश्यक आहे.
 • 6. उद्यानाच्या आवारात दोन जोडणी सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या एक्सचेंजची आवश्यकता नाहीत. तथापि, उद्यानामध्ये लास्ट माईल कनेक्टीव्हीटी (Last Mile Connectivity) उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच इंटरनॅशनल कनेक्टीव्हीटी गेट वे (Gateway for International Connectivity) उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे
6 वाहनतळ (पार्कींगसाठी) माहिती तंत्रज्ञान उद्यानाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या अनुषंगाने प्रति १०० चौ.मीटर बांधकाम क्षेत्रासाठी एक वाहन या परिमाणाने वाहनतळ क्षमता उद्यानात उपलब्ध असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
 • 1. माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी इरादापत्र
 • 1. अर्जदार संस्थेच्या घटनेबाबतचे (Constitution) दस्तऐवज.
 • 2.जागेचे दस्तऐवज (7/12)/ अर्जदार जमिनीचा मालक -नसल्यास
 • अ. जमिनधारकाशी केलेला करारनामा.
 • ब. जागेचे ताबापत्र.
 • 3.रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
 • 4.सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा (Approvad Building Plan) / स्थानिक संस्थेकडील/मुंबई महानगर पालिकेकडील इंटोमेशन ऑफ डिसऍ़प्रुव्हल (IOD – Intimation of Disapproval)/ सक्षम प्राधिकरणाने बांधकाम सुरु करण्यास (Commencement Certificate) दिलेली परवानगी.
 • 5.प्रमाणित वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी वापरावयाच्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
 • 6. वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity) व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मिती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
 • 7. विहित नमुन्यातील शपथपत्र.
 • 8. विकासक संस्थेच्या प्रकल्पाची माहिती विहित नमुन्यात.
 • 9.विकास संस्थेचे नेटवर्थ (C.A. Certified) प्रमाणीत करून
 • 2. माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी De-novo इरादापत्र
 • 1. इरादापत्र व मुदतवाढीच्या प्रती.
 • 2.रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
 • 3. सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा (Approvad Building Plan) / स्थानिक संस्थेकडील/मुंबई महानगर पालिकेकडील इंटोमेशन ऑफ डिसऍ़प्रुव्हल (IOD – Intimation of Disapproval)/ (Commencement Certificate) दिलेली परवानगी. /Occupation Certificate.
 • 4. प्रमाणित वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी वापरावयाच्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
 • 5. वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity) व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मिती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
 • 6. विहित नमुन्यातील शपथपत्र.
 • 3. माहिती तंत्रज्ञान उद्यानासाठी स्थायी नोंदणी
 • अ) इरादापत्राच्या आधारे नोंदणीसाठी :-
 • 1.सक्षम प्राधिकरणाने बांधकाम पूर्ण झाल्या बाबत (Building Completion Certificate) दिलेले प्रमाणपत्र / सक्षम प्राधिकरणाने बांधकाम राहण्यांस योग्य असल्या बाबत (Occupancy Certificate)पूर्ण झाल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र.
 • 2.रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
 • 3.सनदी वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी व प्रत्यक्ष वापरात असलेल्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
 • 4.वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity)व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मीती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
 • 5. माहिती तंत्रज्ञान घटकांची जागे बाबत केलेले नोंदणीचे दस्तावेज व सक्षम प्राधिकारीने दिलेले मा.तं./मा.तं सा.से घटकाचे इरादापत्र/नोंदणीपत्र.
 • 6. विहित नमुन्यातील शपथपत्र.
 • ब) थेट नोंदणीकरीता खालील कागदपत्रे :
 • 1. विहित नमून्यातील अर्ज
 • 2.सक्षम प्राधिकरणाने बांधकाम पूर्ण झाल्या बाबत (Building Completion Certificate) दिलेले प्रमाणपत्र / सक्षम प्राधिकरणाने बांधकाम राहण्यांस योग्य असल्या बाबत (Occupancy Certificate)पूर्ण झाल्य्या बाबत दिलेले प्रमाणपत्र.
 • 3. रु. 5000/- शुल्क भरणा केल्याचे चलन.
 • 4. सनदी वास्तुविशारद यांचे बांधकाम क्षेत्राबाबतच्या माहिती तंत्रज्ञान व इतर प्रयोजनासाठी व प्रत्यक्ष वापरात असलेल्या क्षेत्राच्या विगतवारीचे प्रमाणपत्र.
 • 5. वीज पुरवठा क्षमता, समर्पित विद्युत वाहिनी व्यवस्था, जोडणी (Last mile Conectivity)व्यवस्था, राखीव विद्युत -निर्मीती व्यवस्था, इ. बाबतचे संबंधित पुरवठादार यंत्रणाचे अर्जात –नमूद केल्यानुसार पूरक दस्तऐवज.
 • 6. माहिती तंत्रज्ञान घटकांची जागे बाबत केलेल नोंदणीचे दस्तावेज व सक्षम प्राधिकारीने दिलेले मा.तं./मा.तं सा.से घटकाचे इरादापत्र/नोंदणीपत्र.
 • 7. अर्जदार संस्थेच्या घटनेबाबतचे (Constitution) दस्तऐवज.
 • 8. जागेचे दस्तऐवज (7/12)/ अर्जदार जमिनीचे मालक –नसल्यास
 • अ. जमिनधारकाशी केलेला करारनामा.
 • ब. जागेचे ताबापत्र.
 • 9. विहित नमुन्यातील शपथपत्र
 • 4. खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाला अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक :-
 • 1. छाननी शुल्क रु. 5000/- अदा केल्याची पावती/चलन.
 • 2. उद्योग संचालनालयाकडून प्राप्त केलेल्या इरादापत्राची प्रत.
 • 3. सक्षम प्राधिकरणांने माहिती तंत्रज्ञान वापरासाठी मंजूर केलेला बांधकाम आराखडा.
 • 5. खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना दिलेल्या इरादा पत्र/ नोंदणी प्रमाणपत्रातील नाव/ बांधकाम क्षेत्रफळ इ. संदर्भात सुधारणा
 • 1. उद्योग संचालनालयाकडून प्राप्त केलेल्या इरादापत्राची प्रत.
 • 2. छाननी शुल्क रु. 5000/- अदा केल्याची पावती चलन.
 • 3. सक्षम प्राधिकरणांने मंजूर केलेला सुधारित बांधकाम आराखडा.
 • 4.नावात अथवा व्यवस्थापनात बदल करावयाचा असल्यास तसे त्यासंबंधीचे कंपनीचा ठराव.
 • 6. खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानांना दिलेल्या इरादा पत्राची मुदतवाढ


 • 1. छाननी शुल्क रु. 5000/- अदा केल्याची पावती चलन .
 • 2.उद्यानाच्या ईमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीबाबत सनदी वास्तुरचनाकाराचे प्रमाणपत्र व बार चार्ट (Bar Chart).
 • 3.सहामाही प्रगती अहवाल.
 • 4.कंपनी नेट वर्थ व ताळेबंद.
 • 5.विकासकाने कंपनीची प्रकल्पाची माहिती.
 • 6. विहित नमुन्यातील शपथपत्र.
 • 7: माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटकांना मुद्रांक शुल्क सवलत पात्रता प्रमाणपत्र
 • 1. विहीत नमुन्यात नोंदलेले प्रतिज्ञापत्र.
 • 2.उद्योग नोंदणीची सत्यप्रत / अथवा अन्य ग्राहय नोंदणीची सत्यप्रत.
 • 3.खरेदी करावयाच्या जागेचा अलिकडचा 7/12 उतारा. (माहिती तंत्रज्ञान उद्यान/ म.औ.वि.मं. जागेकरिता आवश्यक नाही) /खरेदी करावयाच्या जागेचा नकाशा. (माहिती तंत्रज्ञान उद्यान जागेकरिता आवश्यक नाही)/ जागेच्या बांधीव मिळकत खरेदीसाठी साठेखताची सत्यप्रत किंवा म.औ.वि.म / माहिती तंत्रज्ञान उद्यान वाटप पत्र/ जागेच्या बांधीव मिळकतीच्या खरेदीखताच्या मसुदयाची प्रत.
 • 4.नियोजित उद्योगाचा प्रकल्प अहवाल.
 • 5.खरेदी करावयाच्या जागेत करावयाच्या नियोजित बांधकामाचा नकाशा.
 • 6.बँकेच्या / वित्तीय संस्थेच्या गहाणखतासाठी कर्ज मंजुरी आदेशाची सत्यप्रत.
 • 7.माहिती तंत्रज्ञान उद्यान/ एमआयडीसी बाहेरील उद्योगांनी स्थानिक नगरपरिषद, महानगरपालिका अथवा नगररचना विभागाचा प्रादेशिक नगररचना आराखडयाप्रमाणे झोनिंग दाखला सादर करावा किंवा औद्योगिक बिनशेती दाखला
 • 8.मुद्रांक शुल्क माफीची सवलत मिळण्यासाठीच्या अर्जावर स्वाक्षरी करणा-या व्यक्तीला प्राधिकृत केल्याबाबत संचालक मंडळाचा ठराव, मुखत्यारपत्राची सत्यप्रत.
 • 9.माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटक म्हणून उद्योग संचालनालयाचे प्राधिकृत अधिकाऱ्या कडून इरादापत्र
 • 8.माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सहाय्यभुत सेवा घटकांना विद्युत शुल्क सवलत पात्रता प्रमाणपत्र
 • 1.विहीत नमुन्यात नोंदलेले प्रतिज्ञापत्र
 • 2.जागेचा दस्ताऐवज , सेल डीड किंवा लीज डीड.
 • 3.अर्जदार संस्थेच्या घटनेबाबतचे (Constitution) दस्तऐवज
 • 4.नियोजित उद्योगाचा प्रकल्प अहवाल
 • 5.विद्युत शुल्क माफीची सवलत मिळण्यासाठीच्या अर्जावर स्वाक्षरी करणा-या व्यक्तीला प्राधिकृत केल्याबाबत संचालक मंडळाचा ठराव, मुखत्यारपत्राची सत्यप्रत
 • 6. पॉवर सँक्शन लेटर
 • 7.महिन्याचे विजेचे बील.
 • 8. घटक सुरु असल्याचे कागदपत्र/कार्यादेश प्रत (Work Order Copy)
 • 9. इएलपी-1 फॉर्म
 • 10.घटकाचे नोंदणी प्रमाणपत्र


दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • 1.सार्वजनिक व खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानाना मूळ चटईक्षेत्र निर्देशांक 1.00 पेक्षा जास्त असला तरी 100% अथवा 200% अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक धरुन एकूण चटईक्षेत्र निर्देशांक 3.00 पेक्षा जास्त अनुज्ञेय असणार नाही इतका अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक उपलब्ध करुन देण्यात येईल.
 • 2. विशेष आर्थिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना विद्युत शुल्क भरण्यापासून कायमस्वरुपी सूट साठी पात्र आहेत.
 • 3. विशेष अर्थिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना विद्युत शुल्क भरण्यापासून कायमस्वरूपी सूट साठी पात्र आहेत.
 • 4.राज्यातील अ व ब क्षेत्राव्यतिरिक्त इतर वर्गीकृत क्षेत्रात स्थापित होणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान घटकांना वीज वापराच्या प्रति युनिट रु. 1 या दराने 3 वर्षपर्येत वीज वापर अनुज्ञेय राहील. (हार्डवेअरमधील गुंतवणूकीच्या अधिन राहून)
 • 5. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वीज दराच्या आदेशाच्या अधिन राहून औद्योगिक दराने वीज पुरवठा करण्यात येईल.
 • 6.माहिती तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक (माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर आणि दूरसंचार हार्डवेअर उत्पादक घटक वगळून) कोणत्याही क्षेत्रात (रहिवासी, ना विकास क्षेत्रासह ) उभारणी करता येईल.
 • 7. सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत वर्गीकरण करण्यात आलेल्या सी, डी, डी+, ना-उद्योग जिल्हे व नक्षलग्रस्त क्षेत्र येथील माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक यांना मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
 • 8.‘अ’ व ‘ब’ प्रवर्ग क्षेत्रामध्ये येणाऱ्या खाजगी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना मुद्रांक शुल्कात 75 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
 • 9.‘अ’ व ‘ब’ प्रवर्ग क्षेत्रामध्ये येणाऱ्या सार्वजनिक माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
 • 10.‘अ’ व ‘ब’ प्रवर्ग क्षेत्रामधील विशेष आर्थिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उद्यानातील माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना तसेच एसटीपीआयने मान्यता दिलेल्या नोंदणीकृ त माहिती तंत्रज्ञान घटकांना मुद्रांक शुल्कात 100 टक्के सूट अनुज्ञेय राहील.
 • 11. राज्यातील नोंदणीकृत माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना त्यांचे विलीनीकरण/ विभक्त किंवा फेररचना झाल्यास, मुद्रांक शुल्कात 75 टक्के सूट देण्यात येईल.
 • 12.अभिहस्तांकित भाडेपट्टयांना आणि कलम 36-ए खाली माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांच्या संमती व परवानगी (अनुज्ञा) करारनाम्यांना मुद्रांक शुल्कात 75 टक्के सूट देण्यात येईल.
 • 13.उत्पादनावरील कार्यसंवेदा कर किमान दरानुसार आकारण्यात येईल.
 • 14. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना जकात/ प्रवेश कर किंवा अन्य करातून सूट देण्यात येईल.
 • 15.मा. तं. व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांना निवासी दराने मालमत्ता कर आकरण्यात येईल.
 • 16. मुल्यवर्धित कर किमान दरानुसार आकारण्यात येईल.
 • 17.आयएसओ 27001 सुरक्षेसाठी आणि सीओपीसी व इएससीएम प्रमाणपत्रांसाठी झालेल्या खर्चापैकी 50 टक्के खर्चाची प्रतिपूर्ती जास्तीत जास्त रुपये 5 लाख, सामुहिक प्रोत्साहन योजनेतील सुक्ष्म व लघुस्तरावरील माहिती तंत्रज्ञान घटकांना करण्यात येईल.
 • औद्योगिक सलोखा व पुरक वातावरण
 • 1. दुकाने व आस्थापना अधिनियमाखालील तरतूदी शिथिल करण्यात आल्या आहेत.
 • 2. भौतिक स्वरुपात हजेरी आणि वेतनविषयक नोंदवहया ठेवण्यातून सूट.
 • 3. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटक उत्पादन प्रक्रियेतून नि:स्त्रुत पाणी निर्माण करीत नाहीत व अशा घटकांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाना घेण्यापासून सूट असेल.
 • 4. विशिष्ट क्षेत्रांचा विकास-ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स तसेच डेटा सेंटरचे प्रवर्तन.
 • 5. माहिती तंत्रज्ञान घटकांना या धोरणाखाली देण्यात आलेले सर्व लाभ मिळण्यास एव्हीजीसी घटक पात्र राहतील.
 • 6. हरित माहिती तंत्रज्ञानाचा विकास.
 • 7. उत्पादनाचा कार्यकाल संपल्यावर ही उत्पादने मागे घेण्याचे निश्चित धोरण असणाऱ्या आणि ई-कचऱ्याकरीता पुनरुत्पादन प्रक्रिया वापरणाऱ्या घटकांना माहिती तंत्रज्ञान उत्पादने खरेदी करताना शासन प्राधान्य देईल.
 • 8. राज्यात उद्योजकता, नाविन्यास आणि इन्क्युबेशन सेंटर्सची स्थापना करण्याकरिता एक मॉडेल व चौकट निश्चित करणे.
 • 9. महाराष्ट्र ब्रँड विकसित करणे सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी आणि विशेषत: एव्हीजीसी शी संबंधित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देश-पातळीवरील व्यावसायिक परिसंवाद, प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांच्या महाराष्ट्रातील आयोजनास शासन पाठिंबा देईल.
 • 10. ग्रामीण आणि निमशहरी भागात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओज) या उपक्रमांचे वाढीस उद्युक्त करणे
 • 11. ललित कला विद्यालय / महाविद्यालय म्हणजे डिजिटल आर्ट सेंटरची स्थापना करणे
 • 12. मुंबई / पुणे येथे सार्वजनिक-खाजगी-भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर आधारीत ए. व्ही जी. सी सेंटर ऑफ एक्सलेंन्स ची स्थापना करण्यात येईल
 • 13. एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरांची (आयआयटीटी) उभारणी करणे.
 • आर्थिक सवलती :-एव्हीजीसी साठी आर्थिक सवलती :
 • • व्हेंचर कॅपिटल फंड निर्माण करणे.
 • • प्रमाणपत्र शुल्क परतावा
 • • अॅनिमेशन चित्रपट निर्मितीसाठी भांडवली अनुदान
 • • करमणूक कर भरण्यापासून सूट
 • • भांडवली अनुदान
 • • बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंगसाठी आर्थिक सवलती :
 • • भांडवली अनुदान
 • • प्रशिक्षण अनुदान
 • • नामांकित संस्थांकडून प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करणे
 • • ग्रामीण व निमशहरी भागातील बी. पी. ओ. ना सुरक्षा ठेव / बयाणा रक्कम भरण्यापासून सूट देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत :
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : 10 दिवस
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :
 • माहिती तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांनी नोंदणीसाठी खालील नोंदणी प्राधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.
 • अ.क्र. माहिती तंत्रज्ञान घटकाचा प्रकार नोंदणी प्राधिकारी
  १. मोठे घटक
 • 1) उद्योग सह संचालक (मुंप्रावि)
 • 2 ) विभागीय सह संचालक
 • 3 ) अधिक्षकीय उद्योग अधिकारी (त्यांच्या अधिकार क्षेत्रात)
2 मुंबई प्राधिकरण विभागातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सुक्ष्म , लघु, मध्यम आणि मोठे घटक. तांत्रिक सल्लागार
3 वरील विभागाव्यतिरिक्त क्षेत्रातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम घटक. 1) उद्योग सह संचालक (मुंप्रावि) 2 महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र ,(त्यांच्या अधिकार क्षेत्रात)
4 विशेष आर्थिक क्षेत्रातील घटक विकास आयुक्त (सेझ)
5 सॉफ्टवेअर सुक्ष्म,लघु आणि मध्यम घटक. संचालक, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स (एसटीपीआय) नवी मुंबई ,पुणे.
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.maharashtra.gov.in

About takmukteshwar

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *