माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना

माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.3000/- प्रोत्साहनपर भत्ता योजना
योजने बद्दलचा शासन निर्णय : दि.3/7/2008 च्या केंद्र शासनाच्या पत्रानुसार
योजनेचा प्रकार :
  • केंद्र पुरस्कृत योजना
योजनेचा उद्देश : माध्यमिक शाळेतील मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी एस.सी./एस.टी संवर्गातील मुलीची संख्या वाठविण्यासाठी व त्या मुली शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे. .
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : एस.सी./एस.टी प्रवर्ग कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयातील मधील सर्व मुली
योजनेच्या प्रमुख अटी :
  • 1) सदर योजनेंतर्गत इ.8 वी ची परीक्षा पास झालेल्या मुलीला भत्ता जातो.
  • 2) सदरची योजना एस.सी./एस.टी प्रवर्गा मधील वर्ष 16 पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यीनीसाठीच लागू आहे.
  • 3)ज्या मुली कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयातील इ.8 वी ऊत्तीर्ण झालेल्या आहेत, अशा सर्वच मुलीनाच लागु आहे.यामध्ये जात संवगाचे बंधन नाही.
  • 4) अविवाहीत मुलींनाच सदरची योजना लागू आहे.
  • 5)तसेच शासकीय/शासन अनुदानित/स्थानिक स्वराज्य संस्थेतील इ. 9वी मध्ये शिकत असलेल्या मुलींसाठीच ही योजना लागू आहे.
  • 6)खाजगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थिनींसाठी सदर योजना लागू नाही.
आवश्यक कागदपत्रे :
  • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.
  • प्रामुख्याने महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र, एस.सी./एस.टी प्रवर्गा तील असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच सदर विद्यार्थीनी इ.10 वी ची परिक्षा पास असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : माध्यमिक शाळेतील मुलीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी एस.सी./एस.टी संवर्गातील मुलीची संख्या वाठविण्यासाठी व त्या मुली शिक्षणाक्ष्या प्रवाहात 18 वर्षा पर्यत सुरु करण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची पद्धत : शिक्षणाधिकारी मार्फत वेब पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करण्यात येतो.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : एका वर्षाच्या आत माहिती प्राप्त होणे अपेक्षित आहे.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: https://scholarships.gov.in सन 2015-16 पासुन ऑन लाईन

About takmukteshwar

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *