शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

Shetkaryache Manogat

शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध

शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का?

शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे .भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते 40 टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान,कर्जमाफी मिळवण्याची असते व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो.

मी आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर !

आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.

Shetkaryache Manogat

मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला.

उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो
आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ? परमेश्वर आणे !

About takmukteshwar

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

2 comments

 1. Shetkaryache Manogat Marathi Essay
  Shetkari nibandh

 2. मराठी निबंध कलेक्शन

  🔹पाऊस पडलाच नाही तर

  https://marathiinfopedia.co.in/paus-padla-nahi-tar-nibandh/

  🔹माझा आवडता छंद

  https://marathiinfopedia.co.in/maza-avadta-chand-in-marathi/

  🔹निसर्ग-खरा मित्र

  https://marathiinfopedia.co.in/nisarg-mazha-mitra/

  🔹भारत देश महान

  https://marathiinfopedia.co.in/haratmaza-desh-mahan/

  🔹वाढती बेरोजगारी एक गंभीर समस्या

  https://marathiinfopedia.co.in/vadhti-berojgari-ek-ganbhir-samasya/

  🔹धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

  https://marathiinfopedia.co.in/dharm-shresth-ki-kayda/

  🔹शेतकरी संपावर गेला तर..

  https://marathiinfopedia.co.in/shetkari-sampavar-gela-tar/

  🔹चंद्र नसता तर..

  https://marathiinfopedia.co.in/chandra-nasta-tar-marathi-essay/

  🔹मोबाइल नसता तर..

  https://marathiinfopedia.co.in/mobile-nasta-tar-marathi-essay/

  🔹सुर्य नसता तर….

  https://marathiinfopedia.co.in/surya-sampavar-gela-tar-marathi-nibandh/

  🔹संगणक शाप की वरदान..

  https://marathiinfopedia.co.in/sanganak-shap-ki-vardan/

  🔹सामाजिक विषमता..

  https://marathiinfopedia.co.in/samajik-vishamta-marathi-nibandh/

  🔹 शेतकर्याचे मनोगत…

  https://marathiinfopedia.co.in/shetkaryache-manogat/

  🔹 सर्व मराठी निबन्ध – https://marathiinfopedia.co.in/marathi-essay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *