मी मराठी

Mi Marathi Kavita

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ।
धर्म,पंत,जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।
आमुच्या मनामनात दंगते मराठी ।
आमुच्या रगारगात रंगते मराठी ।
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी ।
आमुच्या नसानसात नाचते मराठी ।
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी ।
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी ।
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी ।
आमुच्या घराघरात वाढते मराठी ।
येथल्या फुलाफूलात हासते मराठी ।
येथल्या दिशादिशात दाटते मराठी ।
येथल्या नगानगात गर्जते मराठी ।
येथल्या दरीदरीत हिँडते मराठी ।
येथल्या वनावनात गुंजते मराठी ।
येथल्या तरूलखात सादते मराठी ।
येथल्या कळीकळीत लाजते मराठी ।
येथल्या नभानमधुन वर्षते मराठी ।
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी ।
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी ।
येथल्या चराचरात राहते मराठी ।
पाहुने जरी असंख्य पोसते मराठी ।
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ।
हे असे कित्येक खेळ पाहते मराठी ।
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी ।

About admin

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *