स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos

फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे.
तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू दे.
धावताना कधी कधी ठेच हि लागणारच.
रस्ताही कधी कधी शत्रू होऊन वागणारच.
तू मात्र स्वतः कधी अपमानित होऊ नकोस.
स्वाभिमान कुणालाही कधीच विकू नकोस.
बगळ्याची नजर तुझी वादळापासून सावध रहा.
मंजिल दूर असली तरी तू सद्देव धावत रहा.
विचारांचा धागा मात्र आयुष्यभर जपत रहा.
जन्मावर प्रेम करत आनंदाने जगत रहा.
सुखाच्या त्या वसंतात मला मात्र विसरू नको.
माझ्या आयुष्यात नुसतच आठवणीपुरता उरू नको.
मी कुठे म्हणतोय मला कुर्निसात करत जा?
दिसलोच कुठे चुकून तर ओळख मात्र दाखवत जा.

About admin

Check Also

मी मराठी

Mi Marathi Kavita लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *