Atisar

आजाराचा प्रकार

जलजन्‍य आजार

बोली भाषेतील नाव

अतिसार, जुलाब

आजाराचे वर्णन

पातळ पाण्‍यासारखे शैाच

आजारावर परिणाम करणारे घटक

विविध प्रकारच्‍या विषाणू, जीवाणू तसेच इतर पर‍जीवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्‍ये खालील प्रकारांचा समावेश होतो-

 1. कॉलरा – व्‍हीब्रीओ कॉलरा या विशिष्‍ट जीवाणुमुळे होतो. प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्‍यानंतर उलटयाही होतात. कॉलरामध्‍ये पाण्‍यासारखे/भाताच्‍या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्‍ये निर्जलीकरण अत्‍यंत वेगात होते.
 2. गॅस्‍ट्रो – हा आजार वेगवेगळया प्रकाराच्‍या जीवाणू व विषाणुमुळे होतो, या आजारात उलटया व जुलाब एकाच वेळी सुरु होतात.
 3. अतिसार – हा आजार जीवाणू व विषाणुमुळे होतो. या आजारात प्रामुख्‍याने जुलाब होतात.
 4. हगवण – हा आजार परोपजिवी जंतू आमांश (अमिबा) मुळे होतो, या आजारात पोटात दुखते, रक्‍त मिश्रित जुलाब सुरु होतात.

अधिशयन कालावधी

( जंतूने मानवी शरीरात प्रवेश केल्‍यानंतर लक्षणे दिसून येवूपर्यतचा काळ) – काही तास ते ५ दिवस असा आहे.

उपचार

 1. जुलाब-वांत्‍या चालू आहेत पण जलशुष्‍कता नाही क्षारसंजीवनीचा वापर करावा, तसेच पेज, सरबत इत्‍यादि घरगुती पेयांचा वापर करावा.
 2. जलशुष्‍कतेची लक्षणे असल्‍यास – क्षारसं‍जीवनी व घरगुती पेय द्यावी.
 3. तीव्र जलशुष्‍कता असल्‍यास रुग्‍णास नजिकच्‍या प्राथमिक आरोगय केंद्र / ग्रामीण रुगणालय येथे उपचारासाठी भरती करावे व रिंगर लॅक्‍टेट देण्‍यात यावे.
 4. झिंक टॅबलेट मुळेअतिसाराचा कालावधी २५ टक्‍याने कमी होतो. तसेच उलटीचे प्रमाण‍ही घटते.

जलशुष्‍कता कमी करण्‍याबरोबर योग्‍य अॅन्‍टीबायोटिक्‍सची योग्‍य माञा (डोस) देण्‍यात यावी.

निर्देशीत उपचार

तीव्र जलशुष्‍कता असलेल्‍या रुग्‍णाला शीरेवाटे देण्‍याकरीता रिंगर लॅक्‍टेट हे सर्वाधिक योग्‍य द्रावण होयञ

प्रतिबंधात्‍मक उपाय

 1. शुध्‍द पाणी पुरवठा
 2. वैयक्तिक स्‍वच्‍छता
 3. मानवी विष्‍ठेची योग्‍य विल्‍हेवाट
 4. रुग्‍णांवर त्‍वरित उपचार
 5. बालकाचे गोवर प्रतिबंधात्‍मक लसिकरण अतिसाराच्‍या नियंञणासाठी आवश्‍यक आहे.

About admin

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *