Congo Fever

काँगो हिमोरेजीक फिवर

क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर(CCHF)हा विषाणूजन्‍य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्‍वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत .

ठळक मुददे

क्रिमीयन कॉगो हिमोरेजिक फीवर(CCHF)हा विषाणूजन्‍य असून तो गोचिडा पासून संक्रमित होतो.अलिकडील काळात या आजाराचे बरेच तीव्र स्‍वरुपाचे तापाचे उद्रेक आढळून आलेले आहेत .

 • या आजारामध्‍ये मृत्‍यूचे प्रमाण ४० टक्‍के पर्यत आहे.
 • या विषाणूचा प्रसार हा गोचिड व पाळीव प्राण्‍याच्‍या संपर्कामध्‍ये आल्‍यावर होतो
 • भारतामध्‍ये या आजाराचा पहिला रुग्‍ण जानेवारी २०११ मध्ये गुजरात येथे आढळून आलेला आहे.
 • या आजारासाठी कुठलीही लस मानवासाठी तसेच प्राण्‍यासाठी उपलब्‍ध नाही.
 • हा विषाणू हा जंगली तसेच पाळीव प्राणी उदा. गाय,म्‍हैस,शेळी इ. प्राण्यांच्या शरीरात राहतो.
 • प्राण्‍यांना या रोगाची लागण ही दुषित गोचिड चावल्‍यानंतर होते हा विषाणू या प्राण्‍यांच्‍या रक्‍तामध्‍ये साधारणतः आठवडाभर राहतो अशारितीने गोचिड – प्राणी – गोचिड हे जीवनचक्र चालू राहते

प्रसार

या विषाणूचा मानवामध्‍ये प्रसार हा दुषित गोचिड चावल्‍यानंतर किंवा दुषित प्राण्‍याच्‍या रक्‍ताशी संसर्ग झाल्यानंतर होतो. जोखमीचे व्यवसाय –

 • कत्‍तलखान्यातील व्यक्ती
 • पशुपालन व्‍यवसाय
 • शेती
 • पशुवैदयकिय क्षेत्र
मनुष्‍य ते मनुष्‍य अशी या रोगाची लागण जवळचा सहवास उदा. रक्‍तसंसर्ग, स्‍त्राव संपर्क किंवा शरीर दुषित रुग्‍णाच्‍या संपर्कामध्‍ये आल्यानंतर होते. रुग्‍णालयामध्‍ये पुरेशी काळजी न घेतल्‍यामुळे तसेच निर्जंतूक उपकरणाचा वापर न केलेमुळे या रोगाची लागण होण्‍याची सर्वाधिक शक्‍यता राहते. या रोगाचा पारेषण कालावधी हा १ ते ३ दिवस आहे व जास्‍तीत जास्‍त ९ दिवस दिसून येतो.

लक्षणे

या रोगाच्‍या प्रमुख लक्षणामध्‍ये ताप, अंगदुखी,गुंगी, मानदुखी व मानेचा ताठरपणा, पाठदुखी, डोकेदुखी, डोळेदुखी किंवा डोळयांना प्रकाश न सोसणे ही आढळून येतात तसेच उलटी मळमळ, जुलाब, पोटदुखी व घसादुखीही आढळून येते. काही वेळा सतत झोप लागणे, नैराश्‍य, यकृताला सूज, अंगावरती तसेच तोंडामध्‍ये व घशामध्‍ये पुरळ दिसून येतात.काही रुग्‍णांमध्‍ये काविळीची लक्ष्‍णे दिसून येतात.

रोगाचेनिदान

या विषाणूची तपासणी प्रयोगशाळेत एलायझा व पी सी आर व्‍दारे केली जाते.

औषधोपचारः- रिबाव्‍हायरीन (Ribavirin) हे औषध या रोगावर वापरले जाते.

प्रतिबंधात्‍मक आणि नियंत्रणात्‍मक उपाययोजना

 1. संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे वापरावेत.
 2. फिक्कट रंगाचे कपडे वापरावेत त्‍यामुळे गोचिड बसलेनंतर लगेच दिसून येईल.
 3. किटकनाशकभारित कपडे वापरावेत तसेच गोचिड प्रतिबंधक क्रिमचा शरीरावर वापर करावा.
 4. शरीराची तसेच कपडयांची गोचिडीसाठी सतत तपासणी करावी जर गोचिड आढळली तर ती त्‍वरीत सुरक्षितपणे काढून टाकावी.
 5. प्राण्‍यांच्‍या अंगावरील गोचिडींचा नायनाट करावा तसेच ज्‍या भागामध्‍ये गोचिडींचा प्रादुर्भाव आहे तेथे जाणे टाळावे.
 6. ग्लोव्‍हज व इतर सुरक्षित साधनसामुग्रीव्‍दारे जनावरांशी संपर्क करावा.
 7. कत्‍तलखान्‍यामध्‍ये पुरेशी काळजी घेणेत यावी.
 8. कत्‍तलखान्‍यामध्‍ये जनावरे आणण्‍यापुर्वी २ आठवडे योग्‍य त्‍या किटकनाशकाची मात्रा देऊन गोचिडींचा नायनाट करावा.
 9. ज्‍या लोकांना या रोगाची लागण झाली आहे अशा रुग्‍णांशी संपर्क करु नये.
 10. वारंवार हात धुवावेत.
या क्षेत्रामध्‍ये काम करणा-या लोकांनी या रोगाची लागण होऊ नये म्‍हणून वरील सर्व खबरदारी घेऊन काम करणे गरजेचे आहे.
राष्‍ट्रीय कार्यक्रम www.nvbdcp.gov.in

About admin

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *