Dilip Prabhawalkar

Dilip Prabhawalkar

दिलीप प्रभावळकर (dilip prabhawalkar)हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. झपाटललेला या मराठी चित्रपटातील ‘तात्या विंचू’ आणि ‘चौकट राजा’ आणि ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली.

मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी ‘आबा गंगाधर टिपरे ‘ म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या ‘चिमणीव’ मराठी रंगभूमीवरील, ‘हसवा फसवी’ आणि ‘वासूची सासू’ मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या. प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या ‘लगे रहो मुन्ना भाई’ चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.

जन्म ४ ऑगस्ट इ.स. १९४४
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके
कारकीर्दीचा काळ १९७२ – चालू
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख नाटके वासूची सासू, एक झुंज वार्‍याशी, नातीगोती, हसवाफसवी
प्रमुख चित्रपट एक डाव भुताचा
चौकट राजा
झपाटलेला
रात्र आरंभ
सरकारनामा
लगे रहो मुन्नाभाई
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चिमणराव, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
राजीव गांधी पुरस्कार
नाट्यदर्पण,
म. टा. सन्मान

मराठी चित्रपट

वर्ष
चित्रपट
भाषा
भूमिका
२०१७ दशक्रिया (चित्रपट) मराठी
२०१६ फॅमिली कट्टा मराठी
२०१५ गणवेश मराठी
२०१४ विट्टीदांडू मराठी
२०१४ झपाटलेला २ मराठी
२०१४ पोस्टरबॉयस मराठी जगन देशमुख (अप्पा )
२०१३ नारबाची वाडी मराठी नारबा
२०१२ शाळा मराठी अप्पा
२०११ देऊळ मराठी
२०११ मोरया मराठी
२००८ सरकारराज हिंदी
२००८ वळू मराठी
२००६ लगे राहो मुन्ना भाई हिंदी
२००५ पहेली हिंदी
२००४ अगं बाई अरेच्चा! मराठी
२००३ चुपके से हिंदी
२००२ एन्काउन्टर द किलिंग हिंदी
१९९९ रात्र आरंभ मराठी
१९९७ सरकारनामा मराठी
१९९६ कथा दोन गणपतरावांची मराठी
१९९५ बेकाबू हिंदी
१९९३ झपाटलेला मराठी तात्याविंचू
१९९२ एक होता विदूषक मराठी
१९९१ चौकट राजा मराठी
१९८७ छक्के पंजे मराठी
१९८२ एक डाव भुताचा मराठी

पुरस्कार

 • आशियाई चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार (३०-१-२०१८)
 • गंधार पुरस्कार (१५-११-२०१८)
 • गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक
 • नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार
 • नटसम्राट गणपतराव भागवत पुरस्कार
 • पुलोत्सवातर्फे देण्यात आलेला पुलं स्मृती सन्मान (२०१५)
 • महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
 • साहित्य अकादमीचा ‘बाल साहित्य’ पुरस्कार. (‘बोक्या सातबंडे’ या पुस्तक-मालिकेसाठी)
 • शाहू मोडक पुरस्कार (२०१८)
 • संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार
 • सर्वोत्कृष्ट उगवता कलावंत पुरस्कार (प्रेमकहाणीसाठी) (१९७२)

About admin

Check Also

Upendra Limaye

Upendra Limaye Marathi Actor उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ – हयात) हे मराठी चित्रपट, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *