Maza Awadta Vishay Marathi Essay

Maza Awadta Vishay Marathi Essay

माझा आवडता विषय

माझ्या इयत्वेतील सर्वच विषय मला आवडतात. पण माझा आवडता विषय आहे ‘मराठी’
मराठी ही माझी मातृभाषा आहे. मी इंग्रजी माध्यमाच्या शळेत शिकते.

बहुतेक व्यवहारात हिंदी भाषाच वापरली जाते. तरीपण मला सर्वात आवडते मराठी भाषा! अगदी लहानपणी माझी मराठीशी ओळख झाली.

माझे आईबाबा दोघेही डॉक्टर असल्यामुळे दिवसभर कामात असत. मला सांभाळायला मावशी आमच्याकडे राहत. अख्खा दिवस मावशीच्या सहवासात जात असे.

तिच्या माझ्याशी सर्व गप्पागोष्टी चालत त्या शुद्ध मराठीत ! त्यामुळे काऊचिकपासून ज्ञानेश्वर, नामदेवांपर्यंत सर्वाच्या गोष्टी मी मावशीकडून मराठीत ऐकल्या होत्या.
नवीन पुस्तके आणली की, मराठीचे पाठयपुस्तक मी प्रथम वाचून काढते.म्हणून वर्गात शिकताना मला कधीच कंटाळा येत नाही. एखादी कविता मी प्रथम
वाचलेली असते, पण बाईनी तीच कविता शिकवल्यावर मला ती अधिक समजते.
पाठ्यपुस्तकातील बहुतेक सगळ्या कविता मला तोंडपाठ आहेत. इतर अनेक मराठी कविता माझ्या पाठ आहेत. त्यांचा मला निबंध लिहिताना उपयोग होतो.

मी मराठी शुद्धलेखन चांगले समजावून घेतले आहे. त्यामुळे माझ्या लेखनात फारशा चुका होत नाहीत. भरपूर वाचन केल्यामुळे मराठी विषयात मला चांगले गुण मिळतात. त्यामुळेही हा माझा आवडता विषय ठरला आहे.

About admin

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *