Computer network

संगणकाचे नेटवर्क

दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.

संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .

१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते ,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.

2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर

३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .

प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस

प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .

नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .

नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .

१) लोकल एरिया नेटवर्क (LAN) :-

एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते .

२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-

हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .

3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :- जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .

About admin

Check Also

Keyboard

की-बोर्ड (Keyboard):- की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *