अश्विनी भावे

Ashwini Bhave

अश्विनी भावे

ओळख

अश्विनी भावे मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनीचा जन्म ७ मे रोजी भावे कुटुंबामध्ये झाला.

जीवन

अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर तिने ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज‘, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले.

१९९१ साली ’हिना’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अश्विनी लहानपणापासून ’ऋषी कपूर’ ची फॅन होती आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची तिची खूप इच्छा होती. ती इच्छा ’हिना’ चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. त्या आपल्या आवडत्या अभिनेत्याबरोबर तिने ’हनिमून’ व ’मुहब्बत की आरझू’ सारखे अजूनही काही चित्रपट केले. तिचे ’अशान्‍त’, ’सैनिक’, ’जखमी दिल’ हे चित्रपट अक्षय कुमार सोबत आहेत. जॅकी श्रॉफ, विनोद खन्ना व मिथुन चक्रवर्ती हे तिचे सहकलाकार होते. अश्विनीने मीरा का मोहन, परंपरा, कायदा कानून, चौराह, इक्का राजा रानी, वापसी साजन की व युगपुरुष या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे दोनच चित्रपट हिट झाले, श्रीधर बरोबरचा ’भैरवी’ (१९९६) आणि जॅकी श्रॉफ बरोबरचा ’बंधन’ (१९९८). २००७ साली तिने ’कदाचित’ ह्या मराठी चित्रपटामध्ये काम केले.

तिने महाराष्ट्रीय सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनीला आता दोन मुले आहेत आणि ती सन फ्रॅन्सिस्कोला (अमेरिका) रहाते. मराठी चित्रपटाची ओढ आणि आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने बऱ्या वर्षांनंतर तिने मराठी चित्रपट सृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणून. तिने निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ’ हा लहान मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणारा एक अप्रतिम चित्रपट आहे.

मराठी चित्रपट

 • राजलक्ष्मी (१९८७)
 • किस बाई किस (१९८८)
 • अशी ही बनवाबनवी (१९८८)
 • कळत नकळत (१९९१)
 • आहुती (१९९१)
 • झुंज तुझी माझी (१९९२)
 • वजीर (१९९४)
 • सरकारनामा (१९९८)
 • हळद रुसली कुंकू हसलं

हिंदी चित्रपट

 • इक्का राजा रानी
 • कायदा कानून
 • चौराह
 • परंपरा
 • मीरा का मोहन
 • युगपुरुष
 • वापसी साजन की
 • हीना

About admin

Check Also

आदिती सारंगधर

Aditi Sarangdhar आदिती सारंगधर अदिती सारंगधर ही एक मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी चित्रपट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *