युट्युब वरून पैसे कसे कमवायचे पहा?

How to earn Money From Youtube

यु-ट्युब वरून पैसे कसे कमवायचे पहा?

इंटरनेटवर व्हिडीओ पाहण्याचं सध्याच्या घडीला सर्वात मोठं माध्यम म्हणजे यू ट्यूब. याच यू ट्यूबचा पैसे कमवण्यासाठी उत्तम वापर होऊ शकतो. अर्थात अशाप्रकारे अनेकजण पैसे कमवतातही. मात्र, याबाबत अद्याप अनेकजण अनभिज्ञ आहेत. जेव्हा तुम्ही एखादा यू ट्यूबवर एखादा व्हिडीओ प्ले करता, त्यावेळी एक जाहिरात येते. ती जाहिरात पाहिली गेल्यास, व्हिडीओ अपलोड करणाऱ्याला त्याचे पैसे मिळतात. अशाचप्रकारे तुम्हीही पैसे कमवू शकता आणि हे अतिशय सोपेही आहे. यासाठी केवळ एक गूगल अकाऊंट असण्याची गरज आहे. यू ट्यूबसाठी वेगळ्या अकाऊंटचीही गरज नाही. याच अकाऊंटवरुन जीमेलही अॅक्सेस करु शकता.

यू ट्यूब चॅनेल-

गूगल अकाऊंट क्रिएट केल्यानंतर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी यू ट्यूब चॅनेल क्रिएट करण्याची गरज असते. हे चॅनेल यूट्यूबवर तुमचं एकप्रकारे अकाऊंट असेल. यामध्ये व्हिडीओ अपलोज, व्ह्यूज इत्यादी गोष्टी संग्रहित ठेवता येऊ शकतात. यू ट्यूबच्या माय चॅनेल फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा चॅनेल क्रिएट करु शकता. त्यानतंर व्हिडीओ, स्लाईड शोच्या स्वरुपात व्हिडीओ अपलोड केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या यू ट्यूब चॅनेलला आकर्षक करण्यासाठई आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंग्जमध्ये पर्याय आहेत.

पैसे कमवण्यासाठी व्हिडीओ कसा असावा?

व्हिडीओ अपलोड करण्यासाठी व्हिडीओ मॅनेजरची मदत घ्यावी लागते. येथे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारे एडिट करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, व्हिडीओ कसा आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हिडीओ हटके विषयाचे आहे असायला हवेत. कारण तरच युजर्स तुमचा व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी थांबतील. कुणा इतरांचा व्हि़डीओ अपलोड करु नये. अन्यथा कॉपिराईटच्या अडचणींचा सामना करावा लागेल.

व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कसे मिळतील?

यू ट्यूबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर पैसे कसे मिळतील, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला गूगल अॅडसेन्स अकाऊंट तयार करावा लागेल. अॅडसेन्स हे गूगलच्या जाहिरातीसंबंधित माहितीचा ऑफिशिअल टूल आहे. गूगल अॅडसेन्समध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडीओसंदर्भात सर्व माहिती मिळते. कुणी व्हिडीओ पाहिला, किती जणांनी पाहिला, कमेंट्स किती वगैरे सर्व माहिती या टूलमध्ये साठवली जाते. शिवाय, एखाद्या व्हिडीओच्य जाहिरातीतून किती पैसे मिळतील याचीही पूर्ण माहिती तुम्हाला येथे दिली जाते.

Earn Money From Youtube

अॅडसेन्स अकाऊंट तयार केल्यानंतर तुम्हाला यू ट्यूबचा मोनेटायझेशन फीचरही सुरु करावा लागतो. हे फीचर यूट्यूबच्या सेटिंग्जमध्ये दिलेलं असतं. मोनेटायझेश फीचरमुळे तुमच्या जाहिराती दिसण्यास सुरुवात होते आणि त्याचे पैसेही तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते. मोनेटायझेशन सुरु केल्यानतंर यू ट्यूबकडून तुमच्या सर्व माहितीची शहानिशा केली जाते आणि त्यानंतरच तुम्हाला व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी परवानगी दिली जाते.

जाहिराती कशा मिळतील?

मोनेटायझेशनचं फीचर सुरु केल्यानंतर तुम्हाला जाहिराती दिसू लागतात. त्यातून तुम्हाला जाहिराती निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे मोनेटायझेशन फीचर सुरु केल्यानंतर तुमच्या अकाऊंटशी शहानिशा केली जाते, त्यानंतर यू ट्यूबने तुम्हाला परवानगी दिली, तरच तुम्हाला जाहिराती दिसू लागतात.

सोशल मीडियावर शेअर करण्याचे फायदे-

यू ट्यूबवर व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर शेअर करुही शकता. फेसबुक, ट्विटर, डेलीमोशन इत्यादी वेबसाईट्सवर व्हिडीओची लिंक शेअर केल्याने व्हिडीओच्या हिट्स वाढतात. ज्याचा फायदा तुम्हाला होत असतो. जेवढ्या मोठ्या संख्येने तुमचं चॅनेल पाहिलं जाईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसे कमवता येणार आहे.

अपडेट-

तुमच्या यू ट्यूबवर चॅनेलवर रोज नव-नवे व्हिडीओ अपलोड केले गेल्यास त्याचा फायदा तुम्हाला होईल. याचं कारण युजर्सना वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळाल्यावर ते सातत्याने तुमच्या चॅनेलला भेट देतील आणि हिट्स वाढण्यास मदत होईल. जेवढा जास्त वेळ युजर्स यू ट्यूब चॅनेलवर राहतील, तेवढा अधिक फायदा तुम्हाला होईल.

यू ट्यूब पार्टनर पेज-

युजर्सना यू ट्यूबचं पार्टनरही बनण्याची संधी आहे. जर तुम्ही यू ट्यूबचे पार्टनर झालात, तर तुम्हाला टूल्स, सजेशन्स आणि वेगवेगळ्या आयडिया मिळण्याची शक्यता असते. यू ट्यूब पार्टनर बनल्यानंतर पुरस्कार मिळण्याचीही संधी असते. पुरस्काराचा निर्णय व्हिडीओच्या हिट्सवर अवलंबून असतं.

…आणि पैसे मिळायाला सुरु होतात

तुमच्या चॅनेलवर व्हिडीओ अपलोड व्हायला लागले आणि जाहिराती सुरु झाल्यानंतर पैसे मिळण्यासही सुरु होतं. 10 डॉलरच्य कमाईनंतर तुम्हाला पैसे यायला सुरु होतात.

तुमची आवड तु्म्हाला पैसे मिळवून देते-

तुमच्या आवडीच्या विषयांची माहिती, ठिकाणांची व्हिडीओ शूटिंग, तुम्ही खरेदी केलेल्या एखाद्या नव्या प्रॉ़डक्टची व्हिडीओच्या रुपात माहिती तुम्ही तुमच्या चॅनेलवर अपलोड करु शकता. अशा प्रकारे तुमच्या आवडीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमवण्याची संधी असते.

अधिक माहिती साठी संपर्क – 855 280 6019

About admin

Check Also

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

Railway Timetable & Live Status on Whatsapp रेल्वे प्रवासापूर्वी आपल्या ट्रेनचं लाईव्ह स्टेट्स म्हणजे सद्य …